NHAI Reaction On Rishabh Pant Car Accident by Pothole: काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंतचा (Rishabh Pant) भीषण अपघात (Accident) झाला. पंतची प्रकृती स्थिर असली तर त्याच्यावर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे मात्र पंतच्या अपघाताची कसून चौकशी सुरू आहे. ऋषभ पंत अपघात प्रकरणी आता दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. अपघातासंदर्भात माहिती देताना पंतनं हा अपघात वेगामुळे झालेला नाही. तर रस्त्यात आलेला खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं झाल्याचं सांगितलं होतं. पण पंतनं अपघातासंदर्भात सांगितलेल्या माहितीचं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं (NHAI) खंडन केलं आहे. NHAI नं सोमवारी सांगितलं की, जिथे क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारचा अपघात झाला, त्या रस्त्यावर कुठेही कोणताही खड्डा नव्हता. 

अपघात झालेल्या रस्त्यावर खड्डे असल्याचं नाकारलं 

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी रविवारी डेहरादून येथील रुग्णालयात क्रिकेटपटूची भेट घेतल्यानंतर सांगितलं होतं की, ऋषभ पंतनं त्यांना अपघातासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, महामार्गावरील खड्डे टाळण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या कारला अपघात झाला. ऋषभ पंतच्या याच वक्तव्याचा आढावा NHAIनं घेतला. 

NHAI रुडकी विभागाचे प्रकल्प संचालक प्रदीप सिंह गुसैन यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की, “ज्या रस्त्यावर हा अपघात झाला त्या रस्त्यावर एकही खड्डा नव्हता. ज्या रस्त्यावर कारचा अपघात झाला तो रस्ता महामार्गाला लागून असलेल्या कालव्यामुळे (राजवाहा) थोडा अरुंद आहे. या कालव्याचा सिंचनासाठी वापर केला जातो.”

डीडीसीएच्या संचालकांनीही सांगितल्या अडचणी

एनएचएआयचे अधिकारी गुसैन यांनी एनएचएआयनं अपघात स्थळाची दुरुस्ती करून खड्डे बुजवल्याचं वृत्त फेटाळून लावलं. दरम्यान, महामार्गाच्या एका भागाची कामगारांकडून कथित दुरुस्ती केली जात असल्याची काही छायाचित्रं रविवारी संध्याकाळी उशिरा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

news reels Reels

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (DDCA) संचालक श्याम शर्मा, यांनी शनिवारी ऋषभ पंतची भेट घेतली होती. त्यांनी  पंतने खड्डा टाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे कार अपघात झाल्याचं सांगितलं होतं.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

IND vs SL T20 Series: टीम इंडियाला ऋषभ पंतची उणीव भासणार? कर्णधार हार्दिक पांड्या म्हणतो…

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here