नवी दिल्ली: भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत सध्या रुग्णालयात दाखल आहे. रुरकीजवळ ३० डिसेंबरला सकाळी त्यांचा कार अपघात झाला. तेव्हापासून त्याच्यावर डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऋषभ पंतला भेटण्यासाठी कलाकारांपासून ते क्रीडा जगतापर्यंतचे चाहते येत आहेत. पण यावेळेस ऋषभला भेटण्यासाठी त्याला मदत करणारे दोन देवदूत गेले होते. त्यांचा एक फोटो समोर आला आहे.

यावेळी रजत आणि निशू हॉस्पिटलमध्ये ऋषभ पंतला भेटायला आले होते, ते अपघातानंतर पंतसाठी देवदूत म्हणून आले होते. अपघातानंतर रजत आणि निशू यांनी ऋषभ पंतला जवळच्या रुग्णालयात नेले होते. त्यांनी स्वतः ही गोष्ट सांगितली आहे.

वाचा: IND vs SL: उद्यापासून सुरु होणारे टी-२० सामने कुठे लाईव्ह पाहता येणार, वाचा सविस्तर

रजत आणि निशू यांनी सांगितले की, कार अपघातानंतर ऋषभ पंतच्या अंगावर कोणतेही कपडे नव्हते. तेव्हा फक्त रजत आणि निशूनेच त्यांची घोंगडी आणि टॉवेल पंतला दिले होते. यानंतर दोघेही ऋषभ पंतला रुग्णवाहिकेतून रुरकी येथील सक्षम रुग्णालयात घेऊन गेले. जिथे पंतवर प्राथमिक उपचार करण्यात आले होते. यानंतर त्याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले.

ऋषभ पंतचा नवीन फोटो रुग्णालयातून समोर येत आहे. यात रजत आणि निशू ही दोन्ही मुलं दिसत आहेत. यासोबतच ऋषभ पंतची आई सरोजही दिसत आहे. या फोटोत पंतचे हात दिसत आहेत. त्याच्या डाव्या हाताला ड्रीप लावली आहे. त्या हाताला आधार मिळावा यासाठी एक उशी देखील ठेवण्यात आली आहे. ऋषभ पंतच्या उजव्या हाताला पट्टी बांधलेली दिसत आहे.

हेही वाचा: ऋषभ पंतला इन्फेक्शन होण्याची शक्यता, जाणून घ्या काय घडतंय रुग्णालया

Rishabh Pant Mother with Rajat and Nishu

वाचा: IND vs SL: टीम इंडियाची आज २०२३ मधील पहिली लढत, हार्दिकच्या नेतृत्वाची खरी परीक्षा घरच्या मैदानावर

पंतला भेट देणाऱ्यांकडून हेल्थ अपडेट

एकीकडे ऋषभ पंतचे लाखो चाहते तो लवकरात लवकर बरा व्हावा आणि मैदानावर परतावा, यासाठी शुभेच्छा देत आहेत. दुसरीकडे, दररोज त्याच्या तब्येतीबद्दलच्या बातम्यांकडे नजर देऊन असतो कि आज काही नवीन अपडेट उपलब्ध होतील. मात्र, मॅक्स हॉस्पिटलकडून नाही तर आता ऋषभच्या प्रकृतीची माहिती त्याला भेटणाऱ्यांमार्फतच मिळत आहे.

दुखापतीमुळे ऋषभ पंतची श्रीलंकेविरुद्धच्या पुढील मालिकेसाठी टीम इंडियामध्ये निवड झाली नव्हती. यानंतर तो त्याच्या कारने रुरकीला जात होता. दरम्यान, रुरकीजवळील गुरुकुल नरसन परिसरात हा अपघात झाला. पंत कारमध्ये एकटाच होता आणि स्वतः गाडी चालवत होता. पंतने सांगितले की, तो विंड स्क्रीन तोडून बाहेर आला. यानंतर गाडीला भीषण आग लागली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here