IPL 2023 : आयपीएलच्या ( IPL 2023 ) सोळाव्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) चाहत्यांसाठी आनंदाची माहिती समोर आलीय. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी भारताचे माजी कर्णधार आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींचं ( Sourav Ganguly ) संघात पुनरागमन झालंय. मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या आगामी हंगामात सौरव गांगुली यांच्यावर दिल्ली कॅपिटल्स संघाच्या संचालक पदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. बीसीसीआय अध्यक्षांची जबाबदारी खांद्यावर घेण्यापूर्वी सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा भाग होते. सौरव गांगुलींनी मार्च 2019  कॅपिटल्सचे मार्गदर्शक म्हणून काम पाहिलं आहे. 

सौरव गांगुलींनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचं मार्गदर्शक पद सोडलं. सौरव गांगुलींनी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि पुणे वॉरियर्स इंडियाचा कर्णधारपदही भुषवलंय. सौरव गांगुलींनी गेल्या वर्षी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्यानंतर रॉजर बिन्नी यांना बीसीसीआयचे अध्यक्ष बनवण्यात आलं आहे. 

IPL 2023 : पीटीआयची महत्त्वाची माहिती

पीटीआय वृत्तसंस्थेनं आयपीएलच्या सूत्रांचा हवाला देत अशी माहिती दिली की, सौरव गांगुलींची दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीसाठी क्रिकेट संचालक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स व्यतिरिक्त सौरव गांगुली दक्षिण आफ्रिका टी-20 लीगमधील या गटातील दुबई कॅपिटल्स आणि प्रिटोरिया कॅपिटल्स या आंतरराष्ट्रीय संघांनाही मार्गदर्शन करतील.आयपीएलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरव गांगुलींनी दिल्ली कॅपिटल्स संघाच्या संचालक पदासाठी होकार दिलाय. सौरव गांगुली तीन वर्षांनंतर पुन्हा दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमध्ये दिसणार आहेत. सौरब गांगुली यांच्या एन्ट्रीने दिल्ली कॅपीटल्सचा संघ आणि चाहते देखील भारावून गेल्याचे चित्र आहे. लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. 

IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सचा संघ 

ऋषभ पंत (कर्णधार) , डेव्हिड वॉर्नर (उप कर्णधार) , पृथ्वी शॉ, मनीष पांडे, फिलिप सॉल्ट, रिले रुसो, रिपल पटेल, रोवमन पॉवेल, सरफराज खान, यश धुल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, अॅनरिक नॉर्खिया, चेतन साकारिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी एन्गिडी, मुस्तफिजुर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, इशांत शर्मा, मुकेश कुमार.

live reels News Reels

हे देखील वाचा 

IND vs SL T20 Head to Head: भारत-श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला उद्यापासून सुरुवात, हेड टू हेड रेकॉर्डवर एक नजर

 

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here