पाकिस्तानचा माजी कर्णधार याने माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या वर्ल्ड कप संदर्भातील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, बीसीसीआयची (BCCI) इच्छा नव्हती यावर्षी टी-२० वर्ल्ड कप व्हावा. बीसीसीआय एक वजनदार बोर्ड आहे आणि त्यांनी आयसीसीकडून ही गोष्ट मान्य करून घेतली. पाकच्या या दोन्ही खेळाडूंच्या मते भारतीय क्रिकेट बोर्डाला आयपीएलचे आयोजन करायचे होते म्हणून त्यांनी टी-२० वर्ल्ड कप स्थगित केला. नाही तर आशिया कप आणि टी-२० वर्ल्ड कप दोन्ही स्पर्धा झाल्या असत्या.
वाचा-
आशिया कप आणि टी-२० वर्ल्ड कप स्थगित झाल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे उत्पन्न घटले आहे. त्यातच पाकिस्तानच्या खेळाडूना आयपीएल खेळण्याची परवानगी नाही. त्यामुळे अशा प्रकारची प्रतिक्रिया येत आहे. टी-२० वर्ल्ड कप स्थगित झाल्यामुळे बीसीसीआयला सप्टेंबर आणि नोव्हेंबरचा कालावधी मिळत आहे. या काळात आयपीएल स्पर्धा करण्याची योजना सुरू आहे. बीसीसीआय यासंदर्भात एक प्रस्ताव तयार करत असून तो मंजूरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे.
वाचा-
शोएब अख्तरने जिओ क्रिकेटशी बोलताना टी-२० वर्ल्ड कप रद्द होण्यास बीसीसीआय जबाबदार असल्याचे म्हटले होते. टी-२० वर्ल्ड कप आणि आशिया स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांना एकमेकांविरुद्ध खेळता आले असते. पण भारताने ती संधी गमावली.
वाचा-
मी राशिद लतीफला याआधी सांगितले होते की टी-२० वर्ल्ड कप यावेळी होऊ शकतो. पण बीसीसीआय तसे होऊ देणार नाही. वर्ल्ड कप खड्ड्यात गेला तरी चालेल पण आयपीएलचे नुकसान होता कामा नये, असे अख्तर म्हणाला होता.
आयसीसीने टी-२० वर्ल्ड कप यासाठी स्थगित केला गेला की सर्व क्रिकेट बोर्डांचा फायदा होईल, असे लतीफ म्हणाला. त्याने आशिया कप स्पर्धा रद्द करण्याची घोषणा सौरव गांगुलीने परस्पर केल्याच्या घटनेवर सवाल उपस्थित केला.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times