क्रिकेटपटू आणि बॉलीवूड अभिनेत्री यांच्यातील प्रेम प्रकरणं आणि अफेअर्स या बऱ्याच काळापासून सुरु आहेत. पूर्वीही क्रिकेटपटू आणि बॉलीवूड अभिनेत्री यांच्यामध्ये अफेअर्स व्हायची, पण ही अफेअर्स लपवली जायची किंवा लोकांना समजायची नाही. क्रिकेटपटू आणि बॉलीवूड अभिनेत्री यांच्यात अफेअर असल्याची गोष्ट चाहत्यांना मुलीच्या जन्मानंतर समजली होती.

क्रिकेटच्या विश्वातील एक दादा क्रिकेटपटू आणि बॉलीवूडमधील अभिनेत्री यांच्यामध्ये १९८० च्या दशकात अफेअर सुरु झाले होते. त्यावेळी तो क्रिकेटपटू विवाहित होता. हे त्या अभिनेत्रीलाही माहिती होते. पण दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले होते आणि त्या दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. पण ही गोष्ट त्यांच्या चाहत्यांना माहिती नव्हती. पण जेव्हा या दोघांना मुलगी झाली त्यानंतर चाहत्यांना या दोघांमधील अफेअरबाबत समजले.

वाचा-

ही गोष्ट घडील तरी कशी…भारतामध्ये १९८७ साली विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी या क्रिकेटपटू आणि अभिनेत्रीची पहिल्यांदा भेट झाली. त्यानंतर या दोघांचा संपर्क वाढत गेला आणि त्यांच्यातील मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर काही कालावधीनंतर तो क्रिकेटपटू भारत सोडून आपल्या देशात निघून गेला आणि ती अभिनेत्री भारतातच राहीली. त्याच काळात ही अभिनेत्री गर्भवती असल्याचे समजले. त्यावेळी या अभिनेत्रीला घरातूनही विरोध झाला होता. या अफेअरमुळे मुल जन्माला येऊ नये, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण अभिनेत्री आपल्या निर्णयावर ठाम होते. या काळात अभिनेत्रीच्या आईचेही निधन झाले. पण ती डगमगली नाही. तिला वडिलांनी पाठिंबा दिला आणि अखेर त्या अभिनेत्रीला मुलगी झाली.
वाचा-

मुलगी झाल्याची गोष्ट अभिनेत्रीने क्रिकेटपटूला कळवली. बऱ्याच जणांना वाटत होते की, हा क्रिकेटपटू आता या अभिनेत्रीबरोबर नातं कायम ठेवणार नाही. पण तसे पाहायला मिळाले नाही. या क्रिकेटपटूने आतापर्यंत या अभिनेत्रीचा साथ दिला आहे.

ही गोष्ट आहे तरी कोणाची…

ही गोष्ट आहे वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू विव्ह रीचर्ड्स आणि बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांची. या दोघांचे अजूनही नातं टिकून आहे. या दोघांनी आपल्या मुलीचं नाव मसाबा, असे ठेवले आहे आणि ती फॅशन डिझायनर आहे. मसाबाच्या जन्मानंतरच सर्वांचा या दोघांच्या अफेअरबद्दल समजले होते.

आता या नात्याला रीचर्ड्स यांच्या पहिल्या पत्नीनेही स्वीकारले आहे. त्याचबरोबर मसाबालाही ती आपल्या मुलीप्रमाणेच प्रेम करत असल्याचे पाहायला मिळते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here