Team India Playing 11 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 (India vs Sri Lanka T20 Series) मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (MCA Cricket Stadium) होत आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया मालिका जिंकण्यासाठी अंतिम 11 मध्ये दोन बदलांसह मैदानात उतरत आहे. संजू सॅमसन पहिल्या सामन्यात दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेला आहे. त्यामुळे आज त्याच्या जागी राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) मैदानात उतरत आहे. विशेष म्हणजे राहुल आज पदार्पण करत आहे. याशिवाय अर्शदीप सिंगला हर्षल पटेल याच्या जागी संधी मिळाली आहे. तर नेमकी दोन्ही संघाची अंतिम 11 कशी आहे पाहूया…

कशी आहे टीम इंडिया?

live reels News Reels

हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, अक्षर पटेल, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल


दुसरीकडे श्रीलंकेचा संघ कोणत्याही बदलांशिवाय मैदानात उतरत आहे. नाणेफेक गमावल्यावर बोलताना शनाकाने आज खेळाडू चांगली कामगिरी करतील असा विश्वास दाखवला.

कसा आहे श्रीलंकेचा संघ?

पाथुम निसांका, कुसल मेंडिस(विकेटकिपर), धनंजया डी सिल्वा, चरित असलंका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका(कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षाना, कसून रजिथा, दिलशान मदुशंका

भारताचा काहीसा वेगळा निर्णय

आजचा सामना होणाऱ्या पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर T20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 153 धावा इतकी आहे. तर दुसऱ्या डावात 128 धावा झाल्या आहेत. त्यामुळे येथे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभाराण्याची रणनीती आखतो. तरीही भारताने काहीसा वेगळा प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेतला आहे 

हे देखील वाचा-



sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here