नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार हा लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियावर सक्रीय आहे. इस्टाग्रामवर विराट लोकप्रिय आहे आणि पोस्टच्या माध्यमातून मोठी कमाई देखील करत असतो. विराटचे इस्टाग्रामवर ६६ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. तो एका पेट पोस्टसाठी तब्बल २.२ कोटी इतकी रक्कम घेतो. विराटने इस्टाग्रामवर एक हजारावी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे सध्या तो चर्चेत आलाय.

वाचा-
विराटने इस्टाग्रामवर चाहत्यांना एक सरप्राइज दिले आहे. त्याने १ हजाराव्या पोस्टमध्ये एक खास स्वत:च्या फोटोचा कोलाज तयार केला आहे. या फोटोत विराटचे दोन प्रतिमा दिसतात. एक फोटो वनडे संघातील निळ्या जर्सीतील आहे तर दुसरा फोटो कसोटी सामन्यातील आहे.

हा फोटो पाहता क्षणी विराट दुसऱ्या कोणत्या तरी फलंदाजाशी बोलतोय असे वाटते. फोटो शेअर करताना विराटने फक्त २००८-२०२० इतके लिहले आहे. फोटोतून विराटने त्याचा १२ वर्षाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअर दाखवले आहे. कोलाज केलेल्या फोटतील पहिला फोटो २००८ सालचा आहे, जेव्हा विराटने भारतीय संघाकडून पदार्पण केले होते. तर दुसरा फोटो २०२०चा कसोटी संघातील आहे.

वाचा-

फोटो शेअर करताना विराट म्हणतो, या प्रवासात अनेक गोष्टी शिकता आल्या. तुम्ही दिलेले प्रेम आणि पाठिंबा यासाठी मी आभारी आहे. ही १ हजारावी पोस्ट आहे. त्याच्या या पोस्टवर भारतीय संघातील आजी-माजी खेळाडू तसेच क्रिकेट चाहते प्रतिक्रिया देत आहेत.

अमेरिकेच्या ग्लोबल अ‍ॅडव्हाझरी फर्म डफ अ‍ॅण्ड फेल्प्सने जाहीर केलेल्या रिपोटनुसार काही दिवसांपूर्वी भारतीय सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यू मध्ये सर्वांना मागे टाकत विराट कोहलीने अव्वल स्थान मिळवले होते. विराटने सलग तिसऱ्या वर्षी पहिले स्थान मिळवले आहे. विराटची ब्रँड व्हॅल्यू २३७.५ मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजे १ हजार ६९१ कोटी रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे भारताच्या वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माची ब्रँड व्हॅल्यू २३ मिलियन डॉलर इतकी आहे. विराटची ब्रँड व्हॅल्यू रोहितपेक्षा तब्बल १० पट अधिक आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here