Kedar Jadhav in Ranji : भारतीय फलंदाज केदार जाधव (Kedar Jadhav) मागील बऱ्याच काळापासून टीम इंडियामध्ये (Indian Cricket Team) नसल्याचं दिसून येत आहे. तो आयपीएलमध्येही (IPL) खेळत नसल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान महाराष्ट्र आणि आसाम (Maharashtra vs Aasam) यांच्यात पुण्यात खेळल्या जात असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात केदार जाधवने फलंदाजीत कमाल करत अप्रतिम असं द्वीशतक झळकावलं आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या डावात एकदिवसीय क्रिकेटप्रमाणे फलंदाजी करत केदाने 283 धावांची खेळी केली. त्याने केवळ 283 चेंडूत 283 धावा केल्या.

केदारला त्रिशतक पूर्ण करता आले नसले तरी त्याच्या दमदार खेळीमुळे त्याने संघाला मजबूत स्थितीत नेले. तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राने 9 बाद 594 धावा करून पहिला डाव घोषित केला. दुसरीकडे तिसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा आसामने दुस-या डावात एकही विकेट न गमावता 50 धावा केल्या होत्या. त्याआधी आसामने पहिल्या डावात 274 धावा केल्या होत्या. महाराष्ट्राच्या पहिल्या डावाच्या आधारे आसाम सध्या 316 धावांनी मागे आहे.

केदार जाधवची कमाल फलंदाजी

आसामविरुद्धच्या रणजी सामन्यात केदार जाधवची फलंदाजी सर्वांसाठीच चर्चेचा विषय बनली होती. सामन्यात त्याने एकदिवसीय शैलीत फलंदाजी करताना 283 चेंडूत 283 धावा केल्या. या खेळीत त्याने 21 चौकार आणि 12 षटकार मारले. त्याच्या या स्फोटक खेळीमुळे महाराष्ट्र मजबूत स्थितीत पोहोचला. केदारने बऱ्याच कालावधीनंतर एवढी मोठी खेळी केली आहे. त्याच्याशिवाय सिद्धेश वीरने महाराष्ट्राच्या पहिल्या डावात 106 धावा केल्या. 

आयपीएल लिलावात राहिला ‘अनसोल्ड’

इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल (IPL) स्पर्धेत सीएसके संघाकडून खेळणारा केदार जाधव सीएसकेपासून (CSK) वेगळा झाल्यानंतर त्याला आयपीएल लिलावात कोणत्याही फ्रेंचायझीने विकत घेतलेले नाही. गेल्या दोन हंगामात तो आयपीएल लिलावात अनसोल्डच राहिला.मागील वर्षी 23 डिसेंबर रोजी झालेल्या 2023 च्या आयपीएल लिलावातही (IPL Mini Auction) त्याला कोणताही खरेदीदार मिळाला नाही. यापूर्वी तो CSK संघाचा भाग होता. त्याच वेळी, फेब्रुवारी 2020 नंतर त्याला भारतीय संघातूनही वगळण्यात आले. मात्र आसामविरुद्ध 283 धावांची धडाकेबाज खेळी केदार जाधवने केल्यामुळे तो पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे.

live reels News Reels

हे देखील वाचा-

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here