Worldwide Sports Events Industry : माणसाच्या धकाधकीच्या जीवनात क्रीडा(Sports) हा एक विरंगुळा असल्यानं अलीकडे क्रीडा स्पर्धांना अच्छे दिन येत आहेत. कोणत्याही क्रीडा स्पर्धा मोठ्या प्रमाणावर आता आयोजित होत आहेत. त्यामुळे क्रीडा स्पर्धा आयोजित करणाऱ्या क्रीडा इव्हेंट इंडस्ट्रीचं (Worldwide Sports Events Industry) मार्केटही वाढत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार 2021 मध्ये जागतिक क्रीडा इव्हेंट इंडस्ट्रीची किंमत 184,612.2 मिलीयन डॉलर्स  इतकी होती आणि 2022 ते 2031 पर्यंत 10.5% CAGR नोंदवून 2031 पर्यंत ही किंमत 609,066.8 बिलीयन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज एका अहवालातून वर्तवण्यात आला  आहे. ResearchAndMarkets.com ने समोर आलेल्या रिपोर्ट्समधून ही माहिती समोर आली आहे.

क्रिकेटशिवाय ऑलिम्पिक, फुटबॉल विश्वचषक आणि बास्केटबॉल (NBA) सारख्या क्रीडा स्पर्धांच्या आयोजनामध्ये मागील काही वर्षांत लक्षणीय वाढ हे या बाजाराच्या वाढीचे एक प्रमुख कारण आहे. त्यात विविध खेळांच्या लीग आणि खेळाडूंची वाढती लोकप्रियता या वाढीस आणखी हातभार लावेल, असा अंदाजही वर्तवला जात आहे. त्यात आता आपल्या आवडत्या खेळाचे सामने पाहण्यासाठी डिजिटल पद्धतीने तिकिटं मिळतात. त्यात जगभरात स्मार्टफोनचा वाढता वापर यासह अनेक कारणांमुळे या उद्योगांना विकासाच्या भरपूर संधी मिळतील अशी अपेक्षा आहे. पण अशातच किंमत व्यवस्थापनाचा अभाव आणि तिकिटांच्या किमतींबद्दलची अस्पष्टता, या बाजाराच्या वाढीवर मर्यादा घालू शकते, असाही अंदाज वर्तवला जात आहे.

कोरोनामुळे काहीसा ब्रेक

कोविड-19 साथीच्या आजारामुळे बहुतेक क्रीडा स्पर्धा पुढे ढकलल्या जात आहेत किंवा रद्द केल्या जात आहेत, ज्याचा बाजारावर हानिकारक परिणाम झाला असून अजूनही होत आहे. उदाहरणार्थ, नॅशनल हॉकी लीग (NHL) आणि नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन (NBA) या दोघांनी त्यांचे हंगाम पुढे ढकलले. मेजर लीग बेसबॉल (एमएलबी), मेजर लीग सॉकर (एमएलएस), आणि प्रोफेशनल गोल्फर्स असोसिएशन (पीजीए) टूरचे सीझन सर्व निलंबित करण्यात आले होते. महामारीमुळे काही क्रीडा लीगने त्यांचे वेळापत्रक बदलले. अशा क्रीडा स्पर्धा रद्द झाल्यामुळे उद्योग विक्री आणि उत्पन्न उत्पादनावर परिणाम होतो.

live reels News Reels

कशावर आधारित आहे अहवाल?

क्रीडा इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये पुढील काही वर्षात होणाऱ्या या भव्य बदलाचं भाकित करणारा हा अहवाल विविध गोष्टी विचारांत ठेवून तयार करण्यात आला आहे. यामध्यये क्रीडा इव्हेंट इंडस्ट्रीची वाढत्या किंमतीचा महसूल (Revenue) म्हणाल तर तो सामन्यांची तिकीट, स्पॉन्सरशिप आणि अन्य या तीन गोष्टींवर अवंलंबून आहे. रिपोर्ट तयार करताना ग्राह्य धरलेल्या वयोगटाचा विचार केल्यास 20 वर्षांखालील, 21 ते 40 वर्षे
41 वर्षे आणि त्यावरील असा आहे. तसंच जगभरातील क्रीडा क्षेत्रात सक्रीय विविध देशांनुसार हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

हे देखील वाचा-

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here