Rishabh Pant Health Update : भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतच्या (Rishab Pant car accident) कारला अपघात झाल्यानंतर मागील काही दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. नुकतच पंतच्या गुडघ्याचं (लिगामेंटचं) ऑपरेशन झालं असून ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. त्याची ही शस्त्रक्रिया 6 जानेवारीला मुंबईत झाली. डॉ. पार्डीवाला यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मेडिलक रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये हे ऑपरेशन केलं. मुंबईतील या रुग्णालयात पंतला 3 ते 4 दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. 30 डिसेंबर रोजी दिल्लीहून रुरकीला जात असताना कार अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला होता.

डेहराडूनहून मुंबईला केलं शिफ्ट 

कार अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतच्या गुडघ्यावर (लिगामेंटवर) डेहराडूनमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी त्याला मुंबईला आणण्यात आले. रिपोर्ट्सनुसार, लिगामेंट सर्जरीनंतर पंतला बरं वाटत आहे. याआधी पंतला अनेक दिवस डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिथे प्राथमिक उपचार म्हणून त्याच्या शरीराच्या काही भागांची प्लास्टिक सर्जरी करण्यात आली.

रुरकीला जाताना झाला अपघात

live reels News Reels

ख्रिसमस सेलिब्रेट करून दुबईहून परतलेला ऋषभ पंत 30 डिसेंबरला दिल्लीहून रुरकीला जात होता. यादरम्यान त्याची कार मोहम्मदपूर जतजवळ दुभाजकाला धडकली आणि आग लागली. या भयानक अपघातात पंत गंभीर जखमी झाला. त्याला त्वरीत प्रथमोपचारासाठी रुरकी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर पंतला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. कार अपघातात ऋषभ पंतच्या कपाळावर दोन कट झाल्याची माहिती बीसीसीआयने मॅक्स हॉस्पिटलला दिली होती. त्याच्या उजव्या पायाचा लिगामेंटलाही गंभाररित्या इजा झाली होती.  याशिवाय पाय, पाठ, अंगठा आणि मनगटात खोली आहे. आता लिगामेंट ऑपरेशनमुळे पंत 6 ते 9 महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्रिकेट मालिकेशिवाय तो आयपीएल 2023 मधूनही बाहेर राहू शकतो. जर त्याने तंदुरुस्त होण्यासाठी अधिक वेळ घेतला तर पंत 2023 च्या विश्वचषकातूनही बाहेर राहू शकतो.

काही काळ क्रिकेटपासून दूर रहावं लागणार

एका बीसीसीआय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीत त्यांनी सांगितले होते की “सध्या आम्ही पंतच्या पुन्हा मैदानावर येण्याबाबत बोलू इच्छित नाही. सध्या सर्वांचे लक्ष त्याच्या रिकव्हरीकडे आहे. त्याला बरे होऊ द्या. त्यानंतर तो पुनरागमन करेल. याला अजून वेळ आहे जेव्हा तो 100 ठिक होईल, तेव्हा आपण त्याच्या पुनरागमनाबाबत बोलू.” 

हे देखील वाचा-

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here