IND vs SL, 3rd T20 : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याची सुरुवात संध्याकाळी 7 वाजता होईल. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असेल, कारण याआधी दोन्ही संघांनी 1-1 सामने जिंकून मालिकेत बरोबरी साधली आहे. त्यामुळे आज जिंकणारा संघ मालिकाही जिंकेल. दरम्यान आजच्या या तिसर्‍या सामन्यात दोन्ही संघातील काही खेळाडूंवर अनेकांच्या नजरा असतील. तर यातील पाच महत्त्वाच्या खेळाडूंबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत…

1- अक्षर पटेल 

पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेला अडचणीत आणणाऱ्या अक्षर पटेलवर पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा असणार आहेत. दुसऱ्या टी20 सामन्यात अक्षरने 31 चेंडूत 3 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 65 धावांची धडाकेबाज खेळी केली होती.

2- दासुन शनाका

live reels News Reels

श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका भारताविरुद्धच्या गेल्या पाच डावांमध्ये आक्रमक फॉर्ममध्ये दिसत आहे. दुसऱ्या सामन्यात त्याच्या धडाकेबाज अर्धशतकाने श्रीलंकेला 206 धावांपर्यंत मजल मारता आली. शनाकाने 22 चेंडूंत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 56 धावांची धडाकेबाज खेळी केली. निर्णायक सामन्यातही सर्वांच्या नजरा त्याच्यावर असतील.

3- सूर्यकुमार यादव

दुसऱ्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावणारा सूर्यकुमार यादव तिसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार यात शंका नाही. दुसऱ्या सामन्यात त्याने 36 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 51 धावांची खेळी केली होती.

4- कुसल मेंडिस

श्रीलंकेचा यष्टीरक्षक फलंदाज कुसल मेंडिसनेही दुसऱ्या सामन्यात शानदार खेळी दाखवली. त्याने 31 चेंडूत 52 धावा केल्या. त्याच्या खेळीत 3 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. सलामीला आलेल्या मेंडिसने आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली.

5- हार्दिक पंड्या

या सामन्यात भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याही मोठी भूमिका बजावू शकतो. मागच्या सामन्यात बॅटने फ्लॉप झालेल्या हार्दिक पंड्याने गोलंदाजीत चांगली कामगिरी केली. त्याने 2 षटकात 6.50 च्या इकॉनॉमीसह फक्त 13 धावा दिल्या आणि 1 बळी घेतला. निर्णायक सामन्यात तो फलंदाजीतही कमाल कामगिरी करू शकतो.

हे देखील वाचा-

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here