KL Rahul Practice : भारतीय संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज केएल राहुल (KL Rahul) श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून (IND vs SL ODI) पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. राहुलने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो नेटमध्ये घाम गाळताना दिसत आहे. केएल राहुल गेल्या काही काळापासून त्याच्या खराब फॉर्मशी झगडत आहे. अशा परिस्थितीत संघातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी श्रीलंकेविरुद्धची ही वनडे मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या वर्षी तो अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये अपयशी ठरला होता.

नेट्समध्ये दिसला Vintage KL Rahul

राहुलने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तो त्याच्या जुन्या क्लासिक स्टाईलमध्ये दिसत आहे, अशाच खेळीसाठी तो ओळखला जातो. या व्हिडिओमध्ये राहुल क्लासी शॉट्स खेळताना दिसत आहे. राहुल उत्कृष्ट शॉट्ससाठी जगभर प्रसिद्ध आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहून तो श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शानदार पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका 10 जानेवारी, मंगळवारपासून सुरू होणार आहे.

पाहा केएल राहुलचा सराव

live reels News Reels


कशी असेल मालिका?

मालिकेतील पहिला सामना गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. यानंतर दुसरा सामना 12 जानेवारीला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे. तसंच, मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाईल. सर्व सामने दुपारी दीड वाजल्यापासून सुरू होतील.

राहुलसाठी 2022 वर्ष नव्हते खास

केएल राहुल गेल्या वर्षी खेळल्या गेलेल्या आशिया कप आणि टी-20 विश्वचषक यांसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये फ्लॉप ठरला. गेल्या वर्षी त्याने 4 कसोटी सामन्यात 17.12 च्या सरासरीने 137 धावा केल्या होत्या. याशिवाय त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 10 सामन्यांत 27.88 च्या सरासरीने 251 धावा केल्या. त्याच वेळी, एकूण 16 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 28.93 च्या सरासरीने 434 धावा केल्या.

हे देखील वाचा-sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here