Jadeja in Team India : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) दुखापतीमुळे बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. सध्या जाडेजा संघात परतण्यासाठी एनसीए  अर्थात नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) प्रशिक्षण घेत आहे. तो कधी परतणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान जाडेजाचा टीम इंडियातील साथीदार आणि अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने (R Ashwin) त्याच्या पुनरागमनाबद्दल मोठं विधान केलं आहे. अश्विन म्हणाला की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत जाडेजा संघात पुनरागमन करु शकतो.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लवकरच कसोटी मालिका रंगणार असून त्याबद्दल बोलताना अश्विनने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, ‘जेव्हाही भारतीय भूमीत सीरिज असते, तेव्हा मी त्याआधी खूप मेहनत घेतो. आगामी काळात जाडेजा तंदुरुस्त होऊन संघात पुनरागमन करेल, अशी मला आशा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेच्या तयारीबाबत अश्विन म्हणाला की, ‘मी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत खेळण्यासाठी तयारी करत असून मी खास योगा देखील करत आहे. मी माझ्या फलंदाजीवर खूप मेहनत घेतली आहे. गेल्या 18 महिन्यांत माझ्या फलंदाजीत खूप सुधारणा झाली आहे. घरच्या मालिकेपूर्वी मी नेहमीच मेहनत घेत असतो.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेत जाडेजा-अश्विनचा दमदार फॉर्म

भारताचे दिग्गज फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांनी आतापर्यंत भारतात खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत बरेच रेकॉर्ड केले आहेत. 2013 ते 2017 पर्यंत दोघांनी मिळून एकूण आठ घरच्या मैदानात कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये दोघांच्या नावावर 99 विकेट्स आहेत. या दोघांची जोडी भारतीय खेळपट्ट्यांवर कमाल करतान दिसून येते, अशा परिस्थितीत आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत जाडेजाने पुनरागमन केले तर त्याचा संघाला खूप फायदा होईल, हे नक्की!

live reels News Reels

भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचं वेळापत्रक: 


सामना तारीख ठिकाण
पहिला कसोटी सामना 9 ते 13 फेब्रुवारी   विदर्भ क्रिकेट ग्राऊंड, नागपूर
दुसरा कसोटी सामना 17 ते 21 फेब्रुवारी शेर ए बांग्ला, ढाका
तिसरा कसोटी सामना 1 ते 5 मार्च  अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
चौथा कसोटी सामना 9 ते 13 मार्च हिमाचल प्रदेश क्रिकेट ग्राऊंड, धर्मशाला

हे देखील वाचा-

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here