चीनने जगभरात करोना व्हायरस पोहोचवला, असे म्हटले जाते. त्यामुळे आता चीनवर बहिष्कार टाकण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे. पण सर्व देशांनी हे ठरवण्यापूर्वीच क्रीडा विशअवाने चीनला मोठा धक्का दिल्याचे पाहायला मिळते आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये चीनमध्ये करोना आला, असे म्हटले जाते. त्यानंतर हा व्हायरस जगभरात रोहोचला. त्यामुळे जगभरात करोना बाधिताची संख्या काही लाखांवर पोहोचली आहे. त्याचबरोबर करोनामुळे निधन झालेल्या लकांची संख्याही भरपूर आहे. त्यामुळे चीनला धडा शिकवायला हवा, असे म्हटले जात आहे. पण क्रीडा विश्वाने आता चीनचा चांगलाच धडा शिकवल्याचे पाहायला मिळते.

काही महिन्यांपूर्वी चीनमध्ये करोना व्हायरस पसरला होता. चीनने नोव्हेंबरपासून करोनाला सुरुवात झाली, असे म्हटले होते. पण त्यापूर्वीही चीनमध्ये करोना आला होता, असे एका स्पर्धेतील खेळाडूने सांगितले होते. चीन करोनाबाबत योग्य आणि खरी माहिती देत नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे बहुतांशी देशांनी आता चीनवर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे, पण याबाबत निर्णय झालेला नाही.

चीनवर अजूनही बहिष्का टाकण्यात आला नसला तरी क्रीडा विश्वाने मात्र त्यांना जोरदार धक्का दिला आहे. आता वर्षभर तरी चीनमध्ये कोणतीच स्पर्धा खेळवायची नाही, असे आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनांनी ठरवले आहे. या वर्षभरात चीनमध्ये टेनिसच्या ११ आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार होत्या. या सर्व स्पर्धा एटीपी आणि डब्ल्यूटीए या संघटनांनी आता रद्द केल्याचे पाहायला मिळत आहे.

डब्ल्यूटीएने सात आणि एटीपीने चार स्पर्धा चीनमधील रद्द केलेल्या आहेत. त्याचबरोबर आशियामध्ये एकमेव होणारी मास्टर्स १००० ही स्पर्धाही चीनमधून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चीनसाठी हा मोठा धक्का बसू शकतो. कारण चीनमध्ये टेनिस मोठ्या प्रमाणात खेळले जाते. त्यामुळे चीनमधील टेनिस संघटना आणि खेळाडूंना हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. वर्षभर तरी आता चीनमध्ये टेनिस स्पर्धा होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

याबाबत एटीपी या संघटनेने सांगितले आहे की, ” या वर्षभरातील टेनिसच्या चीनमध्ये होणाऱ्या स्पर्धा आम्ही रद्द करत आहोत. त्यामुळे या वर्षात चीनमध्ये टेनिसची एकही स्पर्धा होणार नाही.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here