इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आजपासून तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. पण हा सामना तुम्ही पहिला असेल तर तुम्हा एक वेगळी गोष्ट पाहायला मिळेल. कसोटी क्रिकेटमधअये पांढऱ्या रंगाचे कपडे असतात आणि इंग्लंडचा संघ निळ्या रंगाची कॅप परिधान करते. पण या सामन्यात इंग्लंडचा संघ लाल रंगाची कॅप परीधान करणार असल्याचे पाहायला मिळत आहे. हे नेमके घडले तरी कसे आणि या मागचे कारण आहे तरी काय, हे जाणून घ्या…

क्रिकेट हे फक्त मनोरंजनाचे साधन नाही. काही वर्षांपासून क्रिकेटच्या माध्यमातून सामाजिक संदेशही दिला जातो. हेच काम इंग्लंडला संघ करणार असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण लाल रंगाची कॅप परीधान करून इंग्लंडचा संघ एक संदेश देऊ पाहत आहे, जे समाजाच्या हिताचे आहे.

लाल कॅप का परीधान केली…
आजपासून सुरु झालेल्या सामन्यात इंग्लंडचा संघ लाल कॅप का परीधान करत आहे, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. हा कसोटी सामना इंग्लंडसाठी खास आहे. कारण हा सामना इंग्लंडचा माजी कर्णधार अँण्ड्र्यू स्ट्रॉसच्या पत्नीच्या स्मृतींमध्ये खेळवला जाणार आहे. पत्नीच्या निधनानंतर स्ट्रॉसने कर्करोगासाठी एक फाऊंडेशन उघडले आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून कर्करोग झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली जाते. त्याचबरोबर कर्करोगाच्या औषध निर्मितीसाठीही मोठे आर्थिक पाठबळ लागले. स्ट्रॉस आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून कर्करोगांवरील प्रयोगांसाठीही आर्थिक मदत करतो.

लाल कॅप परीधान करून काय होणार…
लाल कॅप परीधान करून इंग्लंडचा संघ चाहत्यांना स्ट्रॉसच्या फाऊंडेशनला मदत करण्यासाठी आवाहन करणार आहे. जेवढी रक्कम या आवाहनातून जमा होईल ती कर्करोगाने त्रस्त असलेल्या व्यक्तींना देण्यात येणार आहे. त्यामुळे या सामन्याचा पहिला दिवस इंग्लंडचे खेळाडू लाल रंगाची कॅप स्ट्रॉसच्या पत्नीच्या स्मृतींसाठी परीधान करणार आहे. त्यामुळे या सामन्यात जर इंग्लंडच्या खेळाडूंना लाल ंरंगाची कॅप परीधान केली तर तुम्ही आश्चर्य वाटून घेऊ नका.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here