भारताचे माजी महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्याबरोबर क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूचे आज निधन झाले आहे, ते ७८ वर्षांचे होते.

वाचा-

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर हे क्रिकेटपटू कराचीमध्ये गेले होते. त्यानंतर त्यांनी लंडन गाठले. लंडनमध्ये ते शिक्षकाचे काम करत होते. लंडनमध्येच आज त्यांचे निधन झाले आहे.

वाचा-

भारतीय रेल्वेकडून १९६५-६६ ते १९७३-७४ या कालावधीमध्ये शिराझ धार्सी हे क्रिकेट खेळत होते. भारताच्या संभाव्य संघातही त्यांची निवड करण्यात आली होती. आतापर्यंत त्यांनी ४९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये रेल्वेचे प्रतिनिधीत्व केले होते. ४९ सामन्यांमध्ये चार शतके आणि १२ अर्धशतकांसह २२८८ धावा केल्या होत्या. मुंबई विद्यापीठामध्ये त्यांचे शिक्षण झाले होते. मुंबइ विद्यापीठाच्या क्रिकेट संघाचे ते कर्णधार होते. सुनील गावस्कर या संघातून खेळत असताना धार्सी हे त्यांचे कर्णधार होते. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि जॉली क्रिकेटटर्स या क्लब्जकडून त्यांनी क्रिकेट खेळले होते. मुंबईतील बॉम्बे स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले होते.

वाचा-

याबाबत गावस्कर यांनी सांगितले की, ” धार्सी यांच्या नेतृत्वाखाली मी मुंबई विद्यापीठामध्ये असताना क्रिकेट खेळलो आहे. धार्सी हे उत्तम सलामीवीर होते. त्यावेळी धार्सी आणि सुधीर नाईक यांची सलामीची जोडी प्रसिद्ध होती. त्यावेळी मी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायचो. १९६६ साली सेंट्रल झोन आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये एक सामना झाला होता. या सामन्यात धार्सी खेळले होते. या सामन्यात धार्सी यांनी अर्धशतकही झळकावले होते. धार्सी हे कर्णधार असताना आम्ही पोलिस आमंत्रित स्पर्धाही जिंकली होती. लंडनमध्ये ते शिक्षक होते. जगप्रसिद्ध लॉर्डस क्रिकेट ग्राऊंडच्या जवळील इमारतीमध्ये ते राहत होते. धार्सी हे एक चांगले व्यक्ती होते. त्यांचा स्वभाव शांत होता. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, हीच प्रार्थना.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here