Australia Test Squad Against India: भारताविरुद्धच्या (Team India) कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची (Australia Test Squad) घोषणा करण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं जाहीर केलेल्या 18 सदस्यीय संघात 22 वर्षीय युवा फिरकी गोलंदाज टॉड मर्फीचाही (Todd Murphy) समावेश करण्यात आला आहे. सध्या स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) आणि ऑलराऊंडर कॅमेरून ग्रीन (Cameron Green) यांची दुखापत ऑस्ट्रेलियन संघासाठी चिंतेचा विषय ठरतोय. कसोटी मालिकेच्या सलामीच्या सामन्यात ग्रीनचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर, मिचेल स्टार्क नागपुरात खेळल्या जाणाऱ्या भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत संघाबाहेर असणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान ग्रीन आणि स्टार्कला दुखापत झाली होती. या दोन्ही खेळाडूंना फ्रॅक्चर झालं होतं.

ऑस्ट्रेलियाच्या संघात चार स्पिनर्सचा समावेश 

भारताविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात चार स्पिनर्सचा समावेश करण्यात आला आहे. ऑफस्पिनर टॉड मर्फीनं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये धमाकेदार खेळी केली आहे. त्याची उत्कृष्ट कामगिरी पाहून त्याला संघात स्थान देण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण संघावर नजर टाकली तर टॉड मर्फी, अॅश्टन अगर, मिचेल स्वेपसन आणि नॅथन लायन या स्पिनर्सचा संघात समावेश करण्यात आलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीनं अॅडम झाम्पाऐवजी टॉड मर्फीला प्राधान्य दिलं आहे.

ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघाचे चिफ सिलेक्टर जॉर्ज बेली यांनी मर्फीच्या निवडीचं समर्थन केलं आहे. ते म्हणाले की, मर्फीनं शेफिल्ड शिल्डमधील कामगिरीनं सर्वांनाच प्रभावित केलं आहे. याशिवाय त्यानं ऑस्ट्रेलिया अ आणि प्राईम मिनिस्टर इलेव्हन संघासाठीही चांगली कामगिरी केली आहे. जॉर्ज बेली यांच्या म्हणण्यानुसार, टॉड मर्फीनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये झपाट्यानं प्रगती केली आहे. त्याच्या कामगिरीच्या जोरावर मर्फीचा संघात समावेश करण्यात आला आहे. 

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ 

पेंट कमिंस (कर्णधार), एश्टन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स केरी (विकेटकीपर), कॅमरून ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेजलवुड, ट्रॅविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, लांस मोरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ (उपकर्णधार), मिशेल स्टार्क, मिशेल स्वेपसन, डेविड वार्नर

news reels

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

IND vs SL: रोहित होता म्हणूनच दासुन शनाकाची सेंच्युरी झाली पूर्ण; नाहीतर…

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here