Virat Kohli & Hardik Pandya: चेस मास्टर विराट कोहली आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांच्यात सर्व काही ठीक नसल्याचं समोर आले आहे. टीम इंडियाच्या दोन स्टार खेळाडूंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हार्दिक आणि विराट कोहली यांच्यामध्ये मतभेद असल्याचा अंदाज या व्हिडीओच्या आधारावर चाहत्यांनी बांधला आहे. व्हायरल होणारा मेसेज गुवाहाटीच्या मैदानावरील आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना मंगळवारी गुवाहाटीमध्ये झाला होता. हा सामना भारताने 67 धावांनी जिंकला होता. भारतीय संघ फिल्डिंग करत असातानाचा विराट आणि हार्दिकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

 व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत काय आहे  – 
श्रीलंकेच्या फलंदाज बाद झाल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू सेलिब्रेशन करतानाचा व्हिडीओ आहे. पण या व्हिडीओ हार्दिक आणि विराट कोहली यांच्यातील देहबोली सर्व काही सांगून जातेय. या दोन स्टार खेळाडूमध्ये काहीतरी बिनसल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधला आहे. विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन करताना सर्व खेळाडू एकमेकांना टाळी देत असल्याचं दिसत आहे. त्याचवेळी हार्दिक पांड्या विराट कोहलीला नजरअंदाज करत आहे. यामुळे दोन खेळाडूंमध्ये वाद आहे का? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. 

हार्दिक पांड्यानं सर्व खेळाडूंना हायफाय केलं पण विराट कोहलीला नजरअंदाज केलं. यादरम्यान हार्दिक पांड्याचा हात विराट कोहलीच्या टोपीला लागला. त्यावेली विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्यामध्ये काहीतरी संवाद झाला… त्यानंतर हार्दिक पांड्यानं विराट कोहलीला नजरअंदाज केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हार्दिक आणि विराट कोहली यांच्यामध्ये बिनसलेय का? असा सवाल अनेक चाहत्यांनी उपस्थित केलाय. 

पाहा व्हिडीओ 

news reels


हार्दिक पांड्यानं मस्करीत असं केले की खरेच दोन्ही खेळाडूमध्ये बिनसलेय? यावर सध्या चर्चा सुरु आहे. विराट कोहली फॅन्स आणि हार्दिक पांड्या फॅन्स यांच्यामध्ये सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. 

आणखी वाचा:
Athiya Shetty KL Rahul Wedding : अथिया-केएल राहुलच्या शाही विवाहसोहळ्याकडे चाहत्यांचं लक्ष; सलमान खान, विराट कोहली असणार वऱ्हाडी

 

 sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here