Team India for World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक 2023 (World Cup 2023) यंदा पार पडणार असल्यानं आता विश्वचषकासंबधी चर्चा हळूहळू वाढताना दिसत आहेत. यंदाच्या विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे (india to host odi world cup) आहे. ज्यामुळे टीम इंडियाकडून आणखी अपेक्षा वाढल्या आहेत. याआधी या संघाने 2011 च्या विश्वचषकात (2011 World Cup) विजेतेपद पटकावले होते. यावर्षी होणाऱ्या विश्वचषकाबाबत, संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने (Gautam Gambhir) भारतीय संघासाठी चार फिरकीपटूंची निवड केली आहे. पण त्याने संघाचा जादुई आणि अनुभवी फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) आपल्या यादीतून दूर ठेवलं आहे.

या फिरकीपटूंची केली निवड

एकदिवसीय विश्वचषकाचा विचार करत गंभीरने संघात अक्षर पटेल (Axar Patel), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar), कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) यांची निवड केली. त्याने आपल्या यादीत युझवेंद्र चहलचा समावेश केला नाही. चहल हा संघातील अनुभवी फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. या यादीत समाविष्ट असलेला वॉशिंग्टन सुंदर सातत्याने संघाचा भाग बनत नाही. याशिवाय कुलदीप यादवही संघासाठी सतत सामने खेळत नाही. दुसरीकडे, रवी बिश्नोई हा युवा फिरकी गोलंदाज असून त्याने आतापर्यंत संघासाठी एकच एकदिवसीय सामना खेळला आहे.

कुलदीप-अक्षरची निवड करण्यामागील कारण काय?

news reels

एकदिवसीय विश्वचषक 2023 साठी संघात नेमकी कोणाला संधी मिळेल हे पाहण्याजोगे असणार असून गंभीरनं निवडलेल्या फिरकीपटूंमध्ये अक्षर पटेल आणि कुलदीप यादव सध्या उत्कृष्ट लयीत असल्यानं त्यांना स्थान मिळालं आहे. कुलदीपने अलीकडेच बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने शानदार गोलंदाजी करताना 3 विकेट्स घेतले. कुलदीप यादवला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तो संघासाठी दमदार कामगिरी करतो. याशिवाय अक्षर पटेल सध्या गोलंदाजी आणि फलंदाजीतही चांगली कामगिरी करताना दिसत आहे. अक्षरने श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेत शानदार फलंदाजी केली होती. त्या मालिकेतील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणून निवडण्यात आले.

हे देखील वाचा-

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here