Virat Kohli and Ishan Kishan Dance : भारत आणि श्रीलंका (India vs Sri lanka) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने 4 विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान या विजयासह मालिकेत भारताने 2-0 अशी विजयी आघाडी घेतल्याने फॅन्ससह टीममधील सदस्यही आनंदी होते. त्यामुळेच भारताच्या विजयानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि ईशान किशनने (Ishan Kishan) जबरदस्त डान्स केला. ईडन गार्डन्सवर कोहली आणि ईशानच्या जबरदस्त डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे तसंच चाहते वेगवेगळ्या कमेंट्स देखील या व्हिडीओवर देत आहेत.

कोलकाता वनडेमध्ये श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 215 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 43.2 षटकांत 6 गडी गमावून लक्ष्य गाठले. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. भारतीय संघाच्या या दमदार विजयानंतर कोहलीने ईशान किशनसोबत डान्स केला. त्याचा व्हिडिओ अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. कोहलीचे चाहते त्याचे जुने व्हिडिओ कमेंटमध्ये शेअर करत आहेत. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर भारताच्या विजयानंतर लेझर शोचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान विराट-ईशान करत असलेली ही स्टेप अधिकवेळा अभिनेता अनिल कपूरने केल्याचं पाहायला मिळालं असून विराटने याआधीही मैदानात असा डान्स केला आहे.

news reels

मालिकेत भारताची विजयी आघाडी

भारताने आधी श्रीलंकेला टी20 मालिकेत 2-1 ने मात दिल्यावर आता एकदिवसीय मालिकाही नावावर केली आहे. भारताने वनडे मालिकेतील पहिला सामना 67 धावांनी जिंकला होता. तर दुसरा सामना 40 गडी राखून जिंकला. विराट कोहलीने पहिल्या वनडेत शतक झळकावले. पण दुसऱ्या सामन्यात 4 धावा करून तो मालिकेत  बाद झाला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केएल राहुलने नाबाद अर्धशतक झळकावले. ज्यामुळे भारताने मालिके 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

हे देखील वाचा-



sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here