Rahul Dravid leaves team india : भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) कोलकाता येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर संघ सोडून थेट बंगळुरुकडे रवाना झाला आहे. द्रविड हा बंगळुरुचाच असून त्याची प्रकृती बिघडल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला आहे. समोर आलेल्या माहितीतून राहुलच्या आरोग्य समस्या अधिक गंभीर नसल्यातरी काळजीचा उपाय म्हणून त्याने हा निर्णय़ घेतला आहे. ANI वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान राहुलच्या अनुपस्थितीत माजी क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) संघासोबत जोडला जाण्याची शक्यता वर्तवलि जात आहे. पण राहुलला नेमकी काय आरोग्य समस्या झाली आहे हे अद्याप कळु शकलेलं नाही.

16 वर्षे गाजवलंय भारतीय क्रिकेट

राहुल द्रविडचा 11 जानेवारी 1973 रोजी मध्य प्रदेशच्या इंदोर येथे जन्म झाला. राहुल द्रविडनं 16 वर्ष भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व केलं असून त्याच्याकडे 2005 मध्ये भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देखील सोपवण्यात आली होती. त्यानं 2007 साली कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर 2012 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. राहलनं त्याच्या 16 वर्षाच्या कारकिर्दीत प्रभावी कामगिरी, नम्र आणि मोहक व्यक्तिमत्त्वानं जगभरातील चाहत्यांचे मन जिंकले आहे. भारतीय संघाचा सर्वात भरवशाचा फलंदाज म्हणून द्रविड ओळखला जात. त्याला बाद करणं फारच कठीण असल्यानं द वॉल असं राहुलला म्हणतात. दरम्यान आता मागील काही वर्षे रवी शास्त्री यांच्यानंतर द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे. याआधी एनसीए अर्थात नॅशनल क्रिकेट अकादमीत काम करताना अनेक युवा खेळाडूंना तयार केलं. यामध्ये केएल राहुल, श्रेयस अय्यर, दीपक चाहर अशी कितीतरी नावं आहेत.

भारताची विजयी आघाडी

news reels

भारताने आधी श्रीलंकेला टी20 मालिकेत 2-1 ने मात दिल्यावर आता एकदिवसीय मालिकाही नावावर केली आहे. भारताने वनडे मालिकेतील पहिला सामना 67 धावांनी जिंकला होता. तर दुसरा सामना 40 गडी राखून जिंकला. विराट कोहलीने पहिल्या वनडेत शतक झळकावले. पण दुसऱ्या सामन्यात 4 धावा करून तो मालिकेत  बाद झाला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केएल राहुलने नाबाद अर्धशतक झळकावले. ज्यामुळे भारताने मालिके 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

हे देखील वाचा-

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here