उत्साहाचे वातावरण तयार झाले. त्यात आता आयपीएलच्या १३व्या हंगामाची देखील घोषणा झाली. अशातच एक काळजी वाढवणारी बातमी समोर आली आहे.
वाचा-
दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी एक वाइट बातमी आहे. आफ्रिकेच्या महिला संघातील तीन खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे. या तिन्ही खेळाडूंची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. आफ्रिकेचा महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी ट्रेनिंग कॅम्पमध्ये घेण्यात आलेल्या खेळाडूंच्या करोना चाचणीत ही गोष्टी समोर आली.
वाचा-
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने २७ जुलैपासून ट्रेनिंग कॅम्प आयोजित केला आहे. यात सहभागी होण्यासाठी आलेल्या दोन खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळल्या. एका सपोर्ट स्टाफचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून या तिघांना तातडीने कॅम्पमधून स्वतंत्रपणे क्वारंटाइन करण्यात आले आहे.
वाचा-
आफ्रिकेच्या बोर्डाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कॅम्पमधील दोन क्रिकेटपटू आणि एक स्टाफ यांना करोनाची लागण झाली आहे. या सर्वांना १० दिवसासाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे. या तिघी ट्रेनिंग कॅम्पमध्ये सहभागी होणार नाहीत.
वाचा-
या तिघींच्यात करोना संदर्भात कोणतेही लक्षण आढळले नव्हते. तरी वैद्यकीय टीम सर्वांवर लक्ष ठेवून आहे. करोना संदर्भातील प्रोटोकॉलनुसार त्यांची प्रकृती उत्तम आहे. सर्व खेळाडू ट्रेनिंग कॅम्पमध्ये असून वैद्यकीय टीमने आखून दिलेले प्रोटोकॉलचे पालन केले जात असल्याचे बोर्डाने सांगितले.
वाचा-
करोनामुळे तीन महिन्याहून अधिक काळ क्रिकेट स्पर्धा झाल्या नाहीत. अशात इंग्लंड आणि वेस्ट इंडिज बोर्डाने धाडसी निर्णय घेत कसोटी मालिकेचे आयोजन केले. दोन्ही संघा दरम्यानचा तिसरा आणि अखेरचा सामना सध्या सुरू आहे. या मालिकेच्या यशस्वी आयोजनामुळे अनेक देशांनी क्रिकेट सुरूवात करण्याची प्रक्रिया सुरू केली. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर पाकिस्तानचा संघ इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. या वर्षी आशिया कप आणि टी-२० वर्ल्ड कप स्थगित करण्यात आला असला तरी आयपीएलचा १३वा हंगाम युएईमध्ये होणार आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times