Sachin Tendulkar : सगळीकडे मकर संक्रांतीची (Makar Sankranti 2023) धामधूम सुरु आहे. नवीन वर्षातील पहिलाच सण असल्यामुळे सारेच उत्सुक आहेत. मकर संक्रांतीला तिळाच्या लाडूला विशेष महत्त्व आहे. या सणाच्या आधीपासूनच घराघरांत तिळगुळ बनविले जातात. आणि हे तिळगुळ प्रत्येकाला वाटून ‘तिळगुळ घ्या गोड गोड बोला’ अशा शुभेच्छा दिल्या जातात. हा सण साजरा करताना आपले सेलिब्रिटीही कुठे मागे नाहीत. नुकताच मास्टर ब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आपल्या घरी स्वत:च्या हाताने तिळगुळ बनविले आहेत आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

सण म्हटला की त्यात आनंद, उत्साह, जल्लोष आणि प्रेमाचा गोडवा येतो. हा आनंद साजरा करताना सामान्य नागरिकांसह सेलिब्रिटीही तितकेच उत्साही असतात. असाच एक व्हिडीओ क्रिकेटर सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो स्वत: आपल्या हाताने तिळगुळ बनवताना दिसतोय. तसेच, तिळगुळ बनवताना तो तिळगुळ कसा बनवायचा याची रेसिपीही अत्यंत रंजक पद्धतीनं सांगतोय. या व्हिडीओच्या शेवटी त्याने सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. 

पाहा व्हिडीओ : 

या व्हिडीओमध्ये तिळगुळाचे लाडू बनवताना सचिन तेंडुलकरनं ते कशा पद्धतीने बनविले जातात याची रेसिपीही सांगितली आहे. हा व्हिडीओ बातमी लिहेपर्यंत 6 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर, अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्सदेखील केल्या आहेत. अनेकांनी सचिनला मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर, काहींनी त्याचं कौतुक केलं आहे. 

मकर संक्रांतीचं महत्त्व : 

मकरसंक्रांतीला सूर्य या दिवशी धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या सणाला मकर संक्रांत असे म्हणतात. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. मकर संक्रांतीला महाराष्ट्रात संक्रांत म्हणतात. मकर संक्रांती ज्याला पश्चिम बंगालमध्ये मोकोर सोनक्रांती म्हणूनही ओळखले जाते आणि नेपाळमध्ये माघे संक्रांती असं म्हटलं जातं.

महत्त्वाच्या बातम्या : 

Makar Sankranti Wishes 2023 : मकर संक्रांतीनिमित्त तुमच्या प्रियजनांना ‘या’ खास शुभेच्छा द्या; अन् सणाचा आनंद द्विगुणित कराsports

1 COMMENT

 1. Quantum Ai iѕ ɑ ɡreat investment option іn the cryptocurrency field.

  Whatt yоu reɑd in the bad review һere is ann inaccuracy
  of tһe way thhe bots worқ. All vestments have the risk off
  maҝing you lose funds. Тhere ɑre only varying
  levels of risk yоu arе able to select among.
  I hɑve bеen using thіs app fօr more than an entire year.
  Quantum Ai is thе bst trading tool օut there.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here