Sara Tendulkar: शुभमन गिल (Shubman Gill) याने आज वादळी फलंदाजी करत द्विशतक झळकावलं. या द्विशतकी खेळीत गिलनं 19 चौकार आणि 9 षटकारांचा पाऊस पाडला. गिलच्या 208 धावांच्या बळावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. शुभमन गिलच्या द्विशतकी खेळीनंतर सोशल मीडियावर सचिनची लेक सारा तेंडुलकर ट्रेंड करत होती. नेटकऱ्यांनी सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्यावर अनेक मिम्स पोस्ट केले आहे. काहींनी तर सारा खानच्या आधी सारा तेंडुलकरने लग्न करावं… अशा पोस्ट केल्या आहेत. तर काहींनी सारा तेंडुलकरच्या एंगेजमेंटची घोषणा केली आहे. 

नेटकऱ्यांच्या सोशल मीडियावरील व्हायरल मिम्सनंतर शुभमन गिल सारा अली खानलाही डेट करत होता का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सारा अली खानच्या आधी सारा तेंडुलकरला लग्न करण्याचा सल्ला नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर दिला आहे. 

भारतीय संघाचा युवा फलंदाज शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांचं नाव अनेकदा जोडलं गेलं आहे. त्यांना अनेकदा स्पॉट करण्यात आले आहे. या नात्यावर अद्याप अधिकृत कुणीही बोललेलं नाही. पण त्यांना अनेकदा एकत्र स्पॉट केल्यामुळे अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याशिवाय गेल्या काही दिवसांपासून सारा अली खान आणि शुभमन गिल यांच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या आहेत.  

news reels New Reels

आज शुभमन गिल यानं द्विशतकी खेळी केल्यानंतर सारा तेंडुलकर सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. अनेकजण सारा तेंडुलकरवर मिम्स करत आहे. मैदानावरही अनेकांनी साराच्या नावानं शुभमन गिलला आवाज दिला आहे. आता शुभमन गिलच्या द्विशतकानंतर नेटकऱ्यांनी सारा तेंडुलकराला शुभेच्छा दिल्या आहेत. पाहूयात सोशल मीडियावर कोणते मिम्स व्हायरल झाले आहेत…..




sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here