Social Media Reactions On Michael Bracewell: रोहित शर्माच्या टीम इंडियानं न्यूझीलंडचा पहिल्या वन डेत 12 धावांनी पराभव केला. भारतानं या विजयासह तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 1-0  अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाच्या या विजयी सलामीचा शुभमन गिल हा प्रमुख शिल्पकार ठरला. त्यानं 149 चेंडूंत 208 धावांची वादळी खेळी केली. त्याच्या द्विशतकाला 19 चौकार आणि नऊ षटकारांचा साज होता. त्यामुळंचं टीम इंडियाला 50 षटकांत आठ बाद 349 धावांची मजल मारता आली. प्रत्युत्तर न्यूझीलंडचा डाव कोलमडला होता. पण मायकेल ब्रेसवेल यानं जिगरबाज खेळी केली. मायकेल ब्रेसवेल आणि मिशेल सॅन्टनरच्या सातव्या विकेटसाठी रचलेल्या 162 धावांच्या भागिदारीनं न्यूझीलंडला विजयाची संधी दिली होती. पण भारतीय गोलंदाजांनी 12 धावांनी विजय खेचून आणला. ब्रेसवेलनं 140, तर सॅन्टनरनं 57 धावांची झुंझावाती खेळी केली. 

350 धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडची अवस्था बिकट झाली होती. आघाडीचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत होते. पण मायकेल ब्रेसवेल यानं एकाकी किल्ला लढवला. त्यानं मिशेल सँटनरला हाताशी धरुन न्यूझीलंडला विजयाच्या आशा दाखवल्या होता. पण भारतीय गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी विकेट घेत न्यूझीलंडचा 12 धावांनी पराभव केला. 

ब्रेसवेल याने 78 चेंडूत 140 धावांची वादळी खेळी केली. ब्रेसवेलसमोर भारतीय गोलंदाजी कमकुवत दिसत होती. ब्रेसवेलनं 140 धावांच्या खेळीत 12 चौकार आणि 10 षटकारांचा पाऊस पाडला. त्याशिवाय सँटनरने 57  नं धावांचं महत्वाचं योगदान दिलं. मायकेल ब्रेसवेल आणि सँटरन यांनी विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले. अखेर भारताने 12 धावांनी सामना जिंकला. पण ब्रेसवेलच्या जिगरबाज खेळीनं सर्वांची मनं जिंकली. न्यूझीलंडने सामना गमावला असला तरी ब्रेसवेल यानं सर्वांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर ब्रेसवेलच्या खेळीला दाद दिली जात आहे. क्रीडा चाहत्यांसह माजी क्रिकेटपटूंकडून ब्रेसवेलचं कौतुक होत आहे.

 

news reels New Reels

आणखी वाचा:
शुभमनचं वादळी द्विशतक अन् नेटकऱ्यांकडून सारा तेंडुलकर ट्रोल, काहींनी तर एंगेजमेंटची घोषणाच केली!
Shubman Gill: शानदार, जबरदस्त, जिंदाबाद! शुभमन गिलनं झळकावलं द्विशतक, 18 चौकार अन् 9 षटकारांचा पाऊसsports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here