भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैनाने एक व्हिडीओ यावेळी शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करून रैनाने म्हटले आहे की, ” भारतीय जवान हेच खरे नायक आहे. कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने मी आपल्याला मानवंदना देतो. आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, सुरक्षितपणे श्वास घेता यावा, यासाठी बलिदान देणाऱ्या जवानांप्रती माझी मान कायम झुकलेलीच राहील. आम्ही कायमच तुमचे ऋणी राहू.”
भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने कारगिल दिनाबद्दल म्हटले आहे की, ” कारगिल युद्धादरम्यान भारताच्या ताकदिच्या, वीरतेच्या आणि निस्वार्थ बलिदानाच्या अगणित गोष्टी अविस्मरणीय अशाच आहे. आम्ही नेहमीच देशाप्रती त्यांचे कायम ऋणी राहू.”
भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने यावेळी म्हटले आहे की, ” कारगिल विजय दिवसाबद्दल भारताचे जे शूर जवान शहिद झाले त्यांना माझ्याकडून श्रद्धांजली. आम्ही नेहमीच त्यांचे ऋणी राहू.”
भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून भारताच्या जवानांचा फोटो शेअर केला आहे. यावेळी कैफ म्हणाला की, ” आपल्या शूर जवानांच्या वीरतेला आणि साहसाला सलाम. तुम्ही आता म्हणूनच आम्ही आहोत. कारण तुम्ही दिवस-रात्र निस्वार्थपणे देशाची सेवा करता आणि आमची रक्षा करता. तुम्हाला सलाम. जय हिंद…”
भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने यावेळी म्हटले आहे की, ” कारगिल युद्धातील सर्व जवानांना माझे नमन. या युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली. भारतीय जवान नेहमीच आमची सुरक्षा करत असतात, त्यासाठी त्यांना बलिदानही द्यावे लागते. त्यामुळे त्यांना सलाम, जय हिंद…”
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तीन महिने हे युद्ध चालू होते. पण भारताने अखेर या दिवशी पाकिस्तानवर विजय मिळवला होता.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times