Hockey WC 2023: भारतीय हॉकी संघानं वेल्सचा 4-2 च्या फरकानं पराभव करत विश्वचषकातील दुसरा विजय नोंदवला आहे. या विजयासह भारताच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहचण्याच्या आशा वाढल्या आहेत. ग्रुप डीच्या अखेरच्या सामन्यात भारताने वेल्सचा पराभव केला. भारताचा हा दुसरा विजय आहे. याआधी भारताने स्पेनचा 2-0 च्या फरकाने पराभव केला होता. तर इंग्लंडविरोधातील सामना बरोबरीत ड्रॉ राहिला होता. (India vs Wales Match) भारत आणि वेल्स यांच्यातील ही लढत अतिशय रोमांचक झाली. अखेरच्या क्वार्टरमध्ये टीम इंडियानं बाजी मारली. उपांत्य पूर्व फेरीत पोहचण्यासाठी भारतापुढे आता न्यूजीलंडच्य संघाचं आव्हान आहे. न्यूझीलंड आणि टीम इंडियामद्ये क्रॉस ओवर सामना होणार आहे. हा सामना 22 जानेवारी रोजी होणार आहे.
कलिंगा स्टेडिअममध्ये झालेल्या सामन्यात भारतासाठी शमशेर सिंह आणि आकाशदीप सिंह यांनी गोल केले. शमशेर सिंह याने भारतासाठी पहिला गोल केला. पहिल्या हाफमध्ये दोन गोलने आघाडी घेतली होती. पण तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस वेल्सने जबरदस्त पुनरागमन केलेय. पेनल्टी कार्नरवर गोल करत वेल्सने 2-2 ने बरोबरी केली. चौथ्या क्वार्टरमध्ये दोन गोल करत भारतीय संघानं हा सामना जिंकला. ग्रुप डी मध्ये भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तीन सामन्यात दोन विजयासह टीम इंडियानं सात गुणांची कमाई केली आहे. इंग्लंडचा संघ डी ग्रुपमध्ये आघाडीवर आहे. इंग्लंडकडे सात गुण आहेत.
Congratulations to Harmanpreet & co. on qualifying for the knockouts phase of the 2023 Men’s FIH Hockey World Cup.
🇮🇳 CHAK DE, INDIA!
New Reels
#HWC2023 #HockeyIndia #TeamIndia pic.twitter.com/Res0UfXaJX
— KDPS Champion Jr. (@KDPSChampionJr) January 19, 2023
रंगतदार सामन्यात शमशेर सिंह याने टीम इंडियासाठी 21 व्या मिनिटाला पेनाल्टी कॉर्नरवर जबरदस्त गोल केला. शमशेर सिंह याच्यानंतर आकाशदीप याने लागोपाठ दोन गोल केले. आकाशदीप याने 32 व्या आणि 45 व्या मिनिटाला फील्ड गोल केले. चौथ्या क्वार्टरमध्ये टीम इंडियाच्या कर्णधाराने पेनाल्टी कॉर्नरवर गोल करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आकाशदीप सिंहला प्लेअर ऑफ दी मॅचचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
IND vs NZ Latest Bews Update : शुभमनचं वादळी द्विशतक अन् नेटकऱ्यांकडून सारा तेंडुलकर ट्रोल, काहींनी तर एंगेजमेंटची घोषणाच केली!
sports