Rahul Dravid Son Become Captain of Karnatka: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विद्यमान कोच द्रविडचा मुलगा अन्वय याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठी जबाबदारी मिळाली आहे. अन्वय याला कर्नाटकच्या अंडर 14 संघाचं कर्णधार करण्यात आले आहे. वडिलांप्रमाणेच अन्वय विकेटकिपर फलंदाज आहे. शांत स्वभाव आणि आक्रमक खेळ यामुळेच अन्वय याच्याकडे कर्नाटक संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. 
  
द्रविडचा मुलगा झाला कर्णधार –

राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड कर्नाटकच्या अंडर 14 संघाचा कर्णधार झाला आहे. अंडर 14 झोलन स्पर्धेत कर्नाटकचा कर्णधार म्हणून अन्वय मैदानात उतरणार आहे. अन्वय विकेटकिपर फंलदाज म्हणून खेळतो. विशेष म्हणजे, राहुल द्रविडही भारतीय संघात विकेटकिपर फलंदाज म्हणून खेळला आहे. अन्वय संयमी आणि आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. 

news reels New Reels

दुसरा मुलगाही क्रिकेटर –

अन्वय याच्याशिवाय राहुल द्रविडचा मोठा मुलगा समितही क्रिकेटर आहे. समितने 2019-20 मध्ये अंडर-14 स्पर्धेत खोऱ्याने धावा काढल्या होत्या. त्याने अनेकदा विस्फोटक फंलदाजी केली होती. या काळात त्याने दोन द्विशतकं झळकावली होती. द्वशतकी खेळीमुळे समित चर्चेत आला होता. द्रविडची दोन्ही मुले चांगलं क्रिकेट खेळतात…. भविष्यात त्यांना टीम इंडियामध्ये स्थान मिळतेय का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 

‘द वॉल’-
भारतीय संघाचा विद्यमान कोच आणि माजी कर्णधार राहुल द्रविड जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखला जातो. द्रविडनं भारतासाठी 164 कसोटी सामन्यात प्रतिनिधित्व केलेय. यादरम्यान त्यानं 36 शतकं झळकावली आहे. तर 13 हजार 288 धावांचा पाऊस पाडलाय. राहुल द्रविडनं 344 एकदिवसीय सामन्यात 12 शतकांच्या मदतीनं 10 हजार 888 धावांचा पाऊस पाडला आहे. संयमी फलंदाजीमुळे राहुल द्रविडला ‘द वॉल’ म्हणून ओळखलं जातं. 

आणखी वाचा:
IND vs NZ Latest Bews Update : न्यूझीलंडनं सामना गमावला पण ब्रेसवेलनं मनं जिंकली, चाहत्यांनी ठोकला कडक सॅल्यूट

IND vs NZ Latest Bews Update : शुभमनचं वादळी द्विशतक अन् नेटकऱ्यांकडून सारा तेंडुलकर ट्रोल, काहींनी तर एंगेजमेंटची घोषणाच केली!sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here