भारतीय क्रिकेट संघातील अष्ठपैलू हार्दिक पंड्या () बाबा होणार आहे. काही दिवसांपूर्वी हार्दिकने त्याची गर्लंफ्रेंड नताशा स्टॅन्कोविक () सोबत विवाह केल्याची आणि आपण बाबा होणार असल्याचे सांगितले होते. पण आता हार्दिकने नताशाबरोबरचा काढेलला फोटो हा रोमँटीक आहे. चाहत्यांनी या फोटोला उस्फुर्तपणे प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे.
करोजनामुळे सध्याच्या घडीला भारतातील क्रिकेटपटू आपल्या घरीच आहे. ते मैदानात सराव करतानाही दिसत नाहीत. पण दुसरीकडे हार्दिकने मात्र आपल्या चाहत्यांसाठी पत्नीबरोबरचा एक रोमँटीक फोटो शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण पंड्या कुटुंबीय घरातील नव्या पाहूण्याच्या स्वागताची तयारी करत आहे. हार्दिकने इस्टाग्रामवर नताशाच्या बेबी बंपसह एक फोटो शेअर केला आहे. हार्दिकने शेअर केलेला हा फोटो आता चांगलाच व्हायरल झालेला आहे.
हार्दिकने या वर्षाच्या सुरुवातीला नताशाबरोबर साखरपुडा केला होता. ही बातमीही हार्दिकने आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातूनच दिली होती. त्यानंतर हार्दिकने नताशाबरोबर लग्न केलं आणि आपल्या घरी नवीन पाहुणा येणार असल्याचेही जाहीर केले. हार्दिकने आपल्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते आणि चाहत्यांनी या फोटोंना जबरदस्त प्रतिसाद दिला होता. आता नताशा गर्भवती असल्याचे फोटोही हार्दिकने सोशल मीडियावर पोस्ट केले असून ते चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.
हार्दिक केल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. गेल्या वर्षी इंग्लंड मध्ये झालेल्या वर्ल्ड कपनंतर त्यांनी कोणताही वनडे सामना खेळला नाही. त्याने अखेरचा टी-२० सामना सप्टेंबरमध्ये खेळला होता. त्यानंतर दुखापतीमुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मार्च महिन्यात आफ्रिकेविरुद्धच्या वनडे संघात त्याला संधी मिळणार होती पण करोनामुळे ही मालिका रद्द झाली.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times