Siraj Gifts iPhone To Friend : हैदराबादचा लोकल बॉय असणारा मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आज भारतीय क्रिकेट संघात हवा करताना दिसत आहे. एका सामान्य रिक्षावाल्याचा मुलगा असणारा सिराज आज आघाडीचा गोलंदाज बनला आहे. विशेष म्हणजे घरच्या मैदानात झालेल्या बुधवारच्या (18 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात सिराजने 4 महत्त्वाच्या विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी केली. यावेळी त्याचे कुटुंबीय आणि मित्रही सामना पाहण्यासाठी उपस्थित होते, ज्यांच्याशी प्रसारमाध्यमांनी संपर्क साधला असता सर्वच फार आनंदी दिसत होते. यावेळी सिराजचा जवळचा मित्र मोहम्मद शफी हा देखील तिथे होता. त्याला सिराजने आयफोन आणि जी शॉकचं घड्याळ भेट म्हणून दिलं होतं, जे त्यानं अगदी आवर्जून कॅमेऱ्यासमोर दाखत हे माझ्यासाठी खूप खास असल्याचं सांगितलं.

सिराजने दिलेलं गिफ्ट जपून ठेवलंय : मोहम्मद शफी

सिराज आणि शफीबद्दल सांगताना सिराजची आई म्हणाली, “सिराज आणि शफी नेहमीच एकत्र राहायचे. बालपणीचे मित्र आहेत,” यानंतर शफी म्हणाला “हा पाहा आयफोन सिराजने भेट दिला आहे आणि हे स्मार्टवॉच देखील तसंच आणखी एक जी-शॉकचं घड्याळ आहे जे त्याने माझ्या वाढदिवशी मला दिले, मी ते जपून ठेवले आहे. कारण ते खूपच महाग आहे,” असं शफीने सिराजबद्दल बोलताना सांगितलं.  

सिराजने विश्वचषकही खेळावा, आईची इच्छा

बुधवारच्या सामन्यात भारताने आधी फलंदाजी करत 349 धावांचा डोंगर उभा केला. शुभमन गिल याने 208 धावांची तुफान खेळी खेळल्यामुळे भारताने हे मोठं लक्ष्य उभारलं. पण न्यूझीलंडनही कडवी झुंज दिली. 337 रन त्यांनी केले पण 12 धावा कमी पडल्याने भारत जिंकला. यावेळी गोलंदाजीत भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजनं उत्कृष्ट गोलंदाजी केली. सिराजने 10 षटकांत 46 धावा देत महत्त्वाच्या 4 विकेट्स घेतल्या. त्याने यावेळी दोन मेडन ओव्हर्सही टाकल्या. दरम्यान सिराजची ही कमाल गोलंदाजी पाहून तो आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघात अशी आशा आहे. दरम्यान या सामन्यातील त्याची कामगिरी पाहून सिराजची आई म्हणाली, ”अवघ्या देशाला अभिमान वाटावा अशी त्याची कामगिरी आहे. त्याची कामगिरी आणखी चांगली होवो आणि तो पुढे जाऊन त्याने विश्वचषकही खेळावा.” 

news reels New Reels

भारताची पुढची लढत रायपूरमध्ये

भारतीय संघ शनिवार अर्थात 21 जानेवारी रोजी रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध आपला पुढचा वनडे सामना खेळणार आहे. हा सामना शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना दुपारी दीड वाजता सुरु होणार असून भारत जिंकल्यास मालिकाही भारताच्या नावावर होणार आहे.

हे देखील वाचा-

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here