Sunil Gavaskar on Sarfaraz Khan : देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागील तीन हंगामात चमकदार कामगिरी करुनही मुंबई संघाच्या सरफराज खानला (Sarfaraz Khan) ऑस्ट्रेलिया वि. भारत (AUS vs IND) यांच्यात फेब्रुवारीत होणाऱ्या कसोटी सामन्यांसाठीच्या संघात संधी मिळालेली नाही. सातत्याने दमदार कामगिरी करुनही सरफराजला संधी न मिळाल्याने क्रिकेट चाहत्यांपासून ते तज्ज्ञ आणि माजी क्रिकेटपटूंमध्ये नाराजी आहे. गेल्या काही दिवसांपासून सरफराजच्या समर्थनार्थ सतत वक्तव्ये येत आहेत.

आता अनुभवी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी देखील बीसीसीआय (BCCI) आणि निवडकर्त्यांवर टीका करताना ते म्हणाले आहेत की, ‘सरफराज खानची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारतीय संघात निवड न होण्याचे मुख्य कारण त्याचा फिटनेस आहे. इंडिया टुडेशी संवाद साधताना गावस्कर या प्रकरणी म्हणाले की, ”जर तुम्ही फक्त स्लिम आणि ट्रिम खेळाडू शोधत असाल, तर तुम्ही फॅशन शोमध्ये जा आणि तिथे काही मॉडेल्स शोधा आणि त्यांना बॅट आणि बॉल द्या.” गावस्कर म्हणाले, ‘क्रिकेटमध्ये असे घडत नाही. तुमच्याकडे प्रत्येक साईजचे क्रिकेटपटू असतील. साईजवर जाऊ नका. तुम्हाला खेळाडूंच्या धावा किंवा त्यांनी घेतलेले विकेट्स पाहावे लागतील. तो शतक झळकावतो तसंत त्यानंतरही मैदानावर टिकून राहतो. यावरून तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे समजते.” 

‘सातत्याने दमदार खेळ म्हणजे तुम्ही फिट आहात’

गावस्कर यावर बोलताना पुढे म्हणतात, ‘तुम्ही तंदुरुस्त नसाल तर पुन्हा पुन्हा शतकं कशी झळकावता येतील. क्रिकेटरचा फिटनेस सर्वात महत्त्वाचा आहे. केवळ यो-यो चाचणी हा निवड निकष असू शकत नाही. ती व्यक्ती क्रिकेटसाठी तंदुरुस्त आहे की नाही याची खात्री त्याच्य खेळावरुन केली जाते. जर तुम्ही सातत्याने चांगलं खेळत असाल म्हणजे तुम्ही फिट आहात इतर गोष्टींनी फरक पडत नाही.

सरफराज जबरदस्त फॉर्मात

news reels New Reels

  

सरफराज खान मागील तीन हंगामात देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणावर धावा करत आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये या फलंदाजाने 2019-20 मध्ये 154.66 च्या सरासरीने 928 धावा केल्या. यानंतर 2021-22 मध्ये त्याने 122.75 च्या सरासरीने 982 धावा केल्या. 2022-23 च्या मोसमातही त्याने आतापर्यंत 900 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत 37 प्रथम श्रेणी सामन्यांच्या 53 डावांमध्ये साडेतीन हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्याची फलंदाजीची सरासरी 80 पेक्षा जास्त आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फलंदाजीच्या सरासरीच्या बाबतीत, तो दिग्गज माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डॉन ब्रॅडमननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हे देखील वाचा-

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here