IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड (India vs New zealand) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना उद्या अर्थात 21 जानेवारी रोजी रायपूर येथे खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. सध्या वनडे मालिकेत टीम इंडिया 1-0 ने पुढे आहे. दुसरी वनडे जिंकून भारतीय संघाला मालिका आपल्या नावावर करायची आहे. पण दुसरीकडे न्यूझीलंड संघ देखील हा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. अशामध्ये या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल जवळपास निश्चित आहे.उमरान मलिकचे पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे.
रायपूर वनडे सामन्यात वेगवान गोलंदाज उमरान मलिकचे पुनरागमन निश्चित असल्याचे मानले जात आहे. त्याचवेळी उमरान मलिकचे भारतीय प्लेईंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाल्यानंतर शार्दुल ठाकूरला बाहेर बसावे लागू शकते. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात उमरान मलिक संघाचा भाग नव्हता. तर शार्दुल ठाकूर प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळला होता. शार्दुल ठाकूरने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 2 विकेट घेतल्या पण सामन्यात त्याने 7.2 षटकात 54 धावा दिल्या. पण या कामगिरीनंतरही त्याला दुसऱ्या वनडेत बाहेर बसावे लागू शकते.
रायपूर वनडेसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन-
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी
New Reels
रायपूर वनडेसाठी न्यूझीलंडची संभाव्य प्लेईंग इलेव्हन-
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक आणि कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर, हेन्री शिपले, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर
भारत 12 धावांनी विजयी
बुधवारच्या सामन्यात भारताने आधी फलंदाजी करत 349 धावांचा डोंगर उभा केला. शुभमन गिल याने 208 धावांची तुफान खेळी खेळल्यामुळे भारताने हे मोठं लक्ष्य उभारलं. पण न्यूझीलंडनंही कडवी झुंज दिली. 337 रन त्यांनी केले पण 12 धावा कमी पडल्याने भारत जिंकला. तर आजवरच्या सामन्यांचा विचार करता भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 113 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 55 सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने 50 सामने जिंकले आहेत. याशिवाय 7 सामन्यांमध्ये कोणताही निकाल लागला नाही आणि एक सामना बरोबरीत सुटला.
हे देखील वाचा-
sports