IND vs NZ 2nd ODI Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) न्यूझीलंड संघाविरुद्ध भारतीय भूमीत एकदिवसीय मालिका (IND vs NZ ODI Series) खेळत आहे. आज मालिकेतील दुसरा सामना रंगणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) हा दुसरा एकदिवसीय सामना रायपूरमध्ये रंगणार आहे. दरम्यान मालिकेतील पहिला सामना भारताने 12 धावांच्या फरकाने जिंकला. तब्बल 350 धावांचे लक्ष्य भारताने यावेळी दिले. शुभमननं 208 धावा रत द्वीशतक केलं. पण न्यूझीलंडच्या ब्रेसवेलनं 140 धावा करत कडवी झुंज दिली, पण अखेर भारतच जिंकला. ज्यानंतर आजचा सामना भारत जिंकल्यास मालिका भारताच्या नावे होईल, तर न्यूझीलंड सामना जिंकल्यास मालिका 1-1 अशी बरोबरीत येईल. तर आजच्या या सामन्याची माहिती जाणून घेऊ…

कधी होणार सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड हा दुसरा एकदिवसीय (India vs New Zealand 2nd ODI) आज अर्थात 21 जानेवारी रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामना खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. 

कुठे आहे सामना?

news reels New Reels

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.  

कुठे पाहता येणार सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

भारताचा एकदिवसीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार)वॉशिंगट सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराद, उमरान मलिक 

न्यूझीलंडचा एकदिवसीय संघ:

फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकिपर/कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, जेकब डफी, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमन, हेन्री शिपले

भारत विरुद्ध न्यूझीलंड Head to Head

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 114 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 56 सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने 50 सामने जिंकले आहेत. याशिवाय 7 सामन्यांमध्ये कोणताही निकाल लागला नाही आणि एक सामना बरोबरीत सुटला.  

हे देखील वाचा-

 

हे देखील वाचा-

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here