खेळाडूला रक्त येत असल्याचे पाहिल्यावर संघाच्या डॉक्टरांनी थेट मैदानात धाव घेतली आणि दुखापतग्रस्त खेळाडूला गाठले. चेंडूवरही यावेळी रक्त लागलेले पाहायला मिळाले. त्यानंतर चेंडूलाही सॅनिटाईज करण्यात आले.
वाचा-
नेमके घडले तरी काय…तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ आज फलंदाजी करत आहे. ही घटना घडली ती आठव्या षटकात. यावेळी वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शेनॉन गॅब्रिएल हा गोलंदाजी करत होता, तर इंग्लंडचा रोरी बर्न्स हा फलंदाजी करत होता. त्यावेळी शेनॉनने एक वेवाने चेंडू टाकला. हा चेंडू रोरीने सोडून दिला. यष्टीरक्षक शेन डॉवरीच हा चेंडू थांबवण्यासाठी सरसावला. त्यावेळी हा चेंडू एवढा वेगवान होता की, शेनच्या ग्लाव्हजमधूनही हा चेंडू बाहेर निघाला आणि थेट त्याच्या ओठांवर लागला. जेव्हा हा चेंडू शेनच्या ओठांवर आदळला तेव्हा तो थेट जमिनीवरच पडला.
वाचा-
शेन जेव्हा थेट जमिनीवर पडला तेव्हा सर्वच खेळाडू घाबरले. शेनची दुखापत नेमकी कशी आहे, हे त्यांना कळत नव्हते. तेव्हा वेस्ट इंडिजचे डॉक्टर हे मैदानात धावत आले आणि शेनकडे पोहोचले. त्यांनी शेनवर उपचार करायला सुरुवात केली. पण शेनवर उपचार मैदानात होऊ शकत नाहीत, हे त्यांना कळून चुकले. कारण शेनची दुखापत ही गंभीर स्वरुपाची होती. त्यामुळे शेनला मैदानाबाहेर हलवण्यात आले.
वाचा-
शेनला मैदानाबाहेर हलवण्यात आल्यानंतर जोशुआ डीसिल्व्हाकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली. जोशुआ आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. यापूर्वी जोशुआच्या नावावर १६ प्रथम श्रेणी सामने आहेत. दुखापतग्रस्त शेनची आता वैद्यकीय चाचणी करण्यात येईल. त्यानंतरच त्याची दुखापत किती गंभीर स्वरुपाची आहे आणि त्याला या दुखापतीतून सारवण्यासाठी किती कालावधी लागेल, हे समजू शकेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times