इंदूर: भारताचा डॅशिंग फिरकीपटू युझवेंद्र चहलने न्यूझीलंड मालिकेदरम्यान प्रवास करतानाचा फोटो इन्स्टाग्राम पोस्ट करून सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. एका महिलेचा फोटो शेअर करत त्याने लिहिले – माझी नवीन ट्रॅव्हल पार्टनर. हा फोटो त्यांची पत्नी धनश्री वर्माचा नसल्यामुळे चर्चांना एकच उधाण आले आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंसाठीच्या बसमधील हा फोटो कुणाचा, असा प्रश्न सर्वानाच पडला असेल तर पाहूया कोण आहे या फोटोमध्ये.

भारताचा हा फिरकीपटू गोलंदाज किती नटखट आणि मस्ती, मस्करी करण्यात किती माहीर आहे, हे आपल्याला माहीतच आहे. त्याचे नाईक मस्किर करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मा पंचांसोबत मस्ती, खेळाडूंची मस्करी करणं, सर्व सत्रादरम्यान मस्ती, क्रिकेटपटूंच्या मुलांसोबत फनी व्हिडीओ आणि स्पाय कॅमेरासोबत त्याचा मस्ती करण्याचा व्हिडीओ तर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. इतकेच नाही तर बीसीसीआय त्याचा ‘चहल टीव्ही’ हा व्हिडीओ सामन्यांदरम्यान पोस्ट करत असते. त्याची अशीच एक मस्करी पुन्हा एकदा या फोटोमधून समोर आली आहे.

वाचा: IND vs NZ: शुभमन गिलला मिळाले नवे नाव, गावस्करांनी लाईव्ह सामान्यातच हजारो

चहलने पोस्ट केलेलाहा मुलीचा फोटो आणि कुलदीप यांचं खास कनेक्शन आहे. ही मुलगी कुलदीपची कोणी मैत्रीण वगैरे नाही. तर स्वतः कुलदीप यादव आहे. चहलने अॅपवर कुलदीपचा मेकओव्हर केलेला फोटो क्लिक केला आणि तो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये हा कुलदीप यादव आहे हे ओळखणे थोडं कठीण आहे. पण आपण नीट निरखून पाहिलं तर समजून येतं कि ते केस, मेकअप खोटे आहेत आणि तो कुलदीप असल्याचे कळून येत आहे.

Yujvendra Chahal New Travel Partner Instagram Story

हेही वाचा: टी-२०मध्ये टीम इंडियाला मिळाला विजयाचा हुकमी एक्का; सनसनाटी गोलंदाजीने ५ धावांत ४

अशाप्रकारे चहलने पुन्हा एकदा त्याचा साथीदार कुलदीपसोबत मस्करी करत तो फोटो सोशल मीडियावर अपलोड केला. बांगलादेश दौऱ्यावर आपापली शानदार कामगिरी केल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या सुरुवातीच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये कुलदीप यादवचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता. यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध चहल दुखापतग्रस्त असतानाही कुलदीपला संधी मिळाली होती.

कुलचा नावाने हे दोन्ही खेळाडूंची जोडी प्रसिद्ध आहे. तसेच हे दोघेही खूप चान्गले मित्र देखील आहेत. हे दोघेही फिरकीपटू असून त्यांच्या फिरकीच्या जोडीने सामन्यात धुमाकूळ घातला होता तेव्हापासून यांना कुलचा म्हणून म्हटले जाते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

8 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here