नवी दिल्ली: कोरना लॉकडाउनमुळे अनेकांचा रोजगार गेला. आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी आणि कुटुंब चालवण्यासाठी काहींना मजूरी करावी लागली. अशीच अवस्था एका भारतीय क्रिकेटपटूची झाली आहे. लॉकडाउनच्या आधी प्रशिक्षण देणारा हा माजी कर्णधार आज गावात मजूरीचे काम करत आहे.

टीम इंडियाचा व्हिलचेअर क्रिकेट संघाचा माजी कर्णधार करोना लॉकडाउनच्या आधी दिव्यांग मुलांना रुद्रापूर येथे क्रिकेटचे प्रशिक्षण देत होता. पण करोनामुळे सुरू झालेले लॉकडाउनने त्याच्या स्वप्नावर पाणी फेरले. राजेंद्रला गावात मजूरी करावी लागत आहे.

वाचा-
भारताच्या व्हिलचेअर क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्या उत्तराखंडचा कर्णधार असलेल्या राजेंद्रला कुटुंबाचा खर्च चालवण्यासाठी मजूरी करावी लागत आहे. ते ज्या मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण देत होते. ते आता येत नसल्यामुळे उत्पन्नाचे साधन नाही.

घरात पैसेच शिल्लक नसल्यामुळे कुटुंबाचे पोट भरण्यासाठी अखेर राजेंद्र यांना मजुरी करावी लागली. त्यांना वयाच्या तिसऱ्या वर्षी पॅरालिसिसचा अटॅक आला. त्यामुळे ते ९० टक्के दिव्यांग झाले. पण राजेंद्र यांनी हार मानला नाही. क्रिकेटच्या मैदानावर त्यांनी नाव कमावले. इतक नव्हे तर इतिहासात विषयात एम ए आणि बीएड ही पदवी घेतली. शैक्षणिक योग्यता आणि क्रीडा क्षेत्रात देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या या खेळाडूकडे करोना लॉकडाउनमुळे उत्पन्नाचे कोणते साधन नाही.

वाचा-
करोनाच्या आधी मी रुद्रपूर येथे व्हिलचेअरवर असणाऱ्या मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण देत होतो. पण आता सर्व काही थांबले आहे. करोना लॉकडाउननंतर मी रायकोट येथे गावी परत आलो. येथेच माझे कुटुंब असल्याचे राजेंद्रने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.

उत्तराखंडच्या व्हिलचेअर संघाचा कर्णधार असताना रजेंद्रने मलेशिया, बांगलादेश आणि नेपाळ या देशांचा दौरा केला आहे. लॉकडाउननंतर काही महिन्यातच परिस्थिती बिघडली. माझ्या आई-वडिलांचे वय झाले आहे. एक बहिण आणि छोटा भाऊ आहे. भाऊ गुजरातमधील एका हॉटेलमध्ये काम करत होता. पण आता त्याची ही नोकरी गेली. त्यामुळेच मनरेगा योजने अंतर्गत गावात काम करतोय, असे ते म्हणाले.

वाचा-

सोनू सूदने केली मदत
या काळात कोणी मदत केली नाही का असा प्रश्न जेव्हा राजेंद्र यांना विचारला तेव्हा ते म्हणाले, काही लोकांनी मदत केली. यात सोनू सूद देखील आहेत. त्यांनी ११ हजार रुपये पाठवले. त्याशिवाय रुद्रपूर आणि पिथोरागड येथून काही लोकांनी मदत पाठवली. त्यामुळे काही दिवसांची सोय झाली, असे राजेंद्र म्हणाले.

राजेंद्र मनरेगात योजनेत दगड फोडण्याचे काम करत असले तरी त्यांचा विश्वास तुटला नाही. ही आव्हाने लवकर संपतील असे ते म्हणाले. जगण्यासाठी कोणतेही काम करण्याचे काहीच चुकीचे नाही. मी मनरेगात यासाठी काम सुरू केले कारण ते माझ्या घरापासून जवळ काम देतात. या सर्व गोष्टी थोड्या कठीण आहेत पण यातून नक्की मार्ग निघेल असे त्यांनी सांगितले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

6 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

  2. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here