KL Rahul Athiya Shetty Wedding : बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. सुनील शेट्टीच्या (Suniel Shetty) खंडाळ्यातील फार्महाऊसवर दाक्षिणात्य पद्धतीने त्यांनी लग्न केलं आहे. 

100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार!

अथिया आणि केएल राहुल फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले आहेत. यात बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वातील अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. लग्नानंतर केएल आणि अथियाने मनोरंजन आणि क्रिकेटविश्वातील मंडळींसाठी खास भव्य रिसेप्शनचं आयोजन केलं आहे. यात रिसेप्शनला अनेक उद्योगपती आणि राजकारणीदेखील उपस्थित राहणार आहेत.

news reels New Reels

ग्रॅंड रिसेप्शन कधी होणार? 

लग्नसोहळ्यादरम्यान सुनील शेट्टी म्हणाले,”केएल राहुल हा माझा जावई नसून मुलगाच आहे. मी जरी नात्याने त्याचा सासरा असलो तरी तो माझा मुलगाच आहे. अथिया आणि केएल राहुलचं रिसेप्शन आयपीएलनंतर (IPL) होणार आहे. लग्नानंतर सुनील शेट्टीने मुलगा अहान शेट्टीबरोबर पापाराझींना पोज दिल्या. तसेच मिठाईदेखील वाटली.


अथिया-केएल राहुलची लव्हस्टोरी जाणून घ्या… (Athiya Shetty KL Rahul Love Story) 

अथिया-राहुल गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 2019 साली एका मित्राच्या पार्टीत केएल राहुलने अथियाला पाहिलं होतं. त्या कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर अखेर आज ते दोघे नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहेत.

संबंधित बातम्या

Athiya Shetty KL Rahul Wedding : आज केएल राहुल चढणार बोहल्यावर; अथिया शेट्टीसोबत अडकणार लग्नबंधनात



sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here