Cricketer Who Married Bollywood Actresses : भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांनी आज खंडाळा येथे लग्नगाठ बांधली. याआधी देखील बॉलिवूड अभिनेत्रींनी भारतीय क्रिकेटपटूंसोबत लग्नगाठ बांधली आहे.  

केएल राहुल आणि अथिया शेट्टी

टीम इंडियाचा फलंदाज केएल राहुलने बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीसोबत आज सात फेरे घेतले. अथिया शेट्टीने हिरो, मोतीचूर-चकनाचूर आणि मुबारकान यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर केएल राहुल अलीकडे टीम इंडियाचा फलंदाज-यष्टिरक्षक आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होता. यानंतर दोघांनी लग्न केले. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा 2017 मध्ये विवाहबद्ध झाले. दोन्ही जोडप्यांनी इटलीमध्ये लग्न केले होते. या लग्नात निवडक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. सध्या दोघांना वामिका नावाची मुलगी आहे.

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने, मॉडेल, बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकसोबत लग्न केले आहे. नताशा स्टॅनकोविक ही मूळची सर्बियाची आहे. दोघांनी 2020 मध्ये लग्न केले आहे. सध्या दोघांना एक मुलगा असून त्याचे नाव अगस्त्य आहे. बिग बॉस व्यतिरिक्त नताशा स्टॅनकोविक अनेक बॉलिवूड चित्रपट आणि छोट्या भूमिकांमध्ये दिसली आहे.

news reels New Reels

युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा

भारतीय संघाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलच्या पत्नीचे नाव धनश्री वर्मा आहे. धनश्री वर्मा कोरिओग्राफर असण्यासोबतच एक परफॉर्मर देखील आहे. याशिवाय ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसली आहे. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. युझवेंद्र चहल त्याची पत्नी धनश्रीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.

झहीर खान आणि सागरिका घाटगे

भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आणि विश्वचषक 2011 चा हिरो झहीर खानने अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत विवाह केला. अभिनेत्री सागरिका घाटगे ‘चक दे ​​इंडिया’मध्ये झळकली होती. त्याशिवाय ती काही मराठी चित्रपटांमध्ये दिसली आहे. झहीर खान आणि सागरिका घाटके यांचे 2015 मध्ये लग्न झाले होते. 

महत्वाच्या बातम्या

KL Rahul Athiya Shetty Wedding Pics : तुझ्यामुळे शिकले प्रेम करायला… लग्नानंतर अथिया शेट्टीची इन्स्टा पोस्ट व्हायरल, समोर आले खास PHOTO

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here