भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांचा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपलेला आहे. त्यामुळे आता यापुढे बीसीसीआयच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार, या चर्चांना उत आला आहे. पण बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी एक उमेदवार असून त्यांना हे पद मिळू शकतं, असं म्हटलं जात आहे. गांगुलीनंतर बीसीसीआयचे अध्यक्षपद कोणाला मिळू शकतं, ते पाहा…

सध्याच्या घडीला थेट बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर कोणालाही बसवता येणार नाही. कारण बीसीसीआयच्या नियमावलींच्या विरोधात गांगुली यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यापुढे बीसीसीआयचा तीन वर्षांचा कुलिंग पिरिएडचा नियम रद्द करावा आणि गांगुली यांना पुढील तीन वर्षे बीसीसीआयमध्ये काम करायला द्यावे, असे त्यांनी याचिकेमध्ये म्हटले आहे. आता १७ ऑगस्टला या याचिकेवर न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यावेळी जर गांगुली यांच्या बाजूने निर्णय आला तर ते पुन्हा बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर विराजमान होऊ शकतात. पण जर गांगुली यांच्या बाजूने हा निकाल लागला नाही तर नक्कीच बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर आपण नवीन व्यक्ती पाहू शकतो.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर कोण बसू शकतो, पाहा….बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी क्रिकेट आणि प्रशासनाचा दांडगा अनुभव असणे गरजेचे आहे. त्यामुळे या पदाच्या शर्यतीमध्ये सर्वात पुढे जे नाव आहे ते म्हणजे ब्रिजेश पटेल. कारण पटेल यांना क्रिकेट आणि प्रशांसनाचा चांगलाच अनुभव आहे. सध्याच्या घडीला ते आयपीएलच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याच पुढाकारामुळे यावर्षी आयपीएल युएईमध्ये आयोजित होत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे गांगुली यांच्यानंतर पटेल यांना बीसीसीआयचे अध्यक्षपद मिळू शकते, असे म्हटले जात आहे.

कसे मिळू शकते बीसीसीआयचे अध्यक्षपद…काही दिवसांपूर्वी जेव्हा बीसीसीआयचा अध्यक्ष निवडायचा होता, तेव्हा त्यामध्ये बराच वाद झाला होता. एकिकडे एन. श्रीनिवासन यांचा गट होता, तर दुसरीकडे भाजपाच्या अमित शाह आणि अनुराग ठाकूर यांचा एक गट होता. शेवटपर्यंत बीसीसीआयचा अध्यक्ष कोण, हे ठरत नव्हते त्यावेळी अमित शहा यांनी यामधअये हस्तक्षेप केला होता आणि गांगुलीला अध्यक्षपद दिले होते. त्यामुळे यावेळीही अमित शहा यांनी जर आपले वजन वापरले तर नक्कीच ब्रिजेश पटेल यांना बीसीसीआयचे अध्यक्षपद मिळू शकते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

  2. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here