भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली हे बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून जाणार असल्याचे कळत आहे. कारण रविवारी (२६ जुलै) गांगुली यांचा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपलेला आहे. आता यापुढेही त्यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर कायम राहता येऊ शकते का, ते जाणून घ्या…

गांगुली यांचा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ काल संपला आहे. बीसीसीआयच्या नियमांनुसार त्यांना आता तीन वर्षांचा कुलिंग पिरीएडमध्ये राहावे लागेल, म्हणजेच त्यांना आता पुढील तीन वर्षे बीसीसीआयचे अध्यक्षपद किंवा कोणतेही पद भूषवता येणार नाही. या तीन वर्षांनंतर ते पुन्हा एकदा बीसीसीआयमध्ये सक्रीय होऊ शकतात.

यापुढेही गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी कसे राहू शकतात…गांगुली यांचा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपलेला आहे. पण बीसीसीआयच्या नियमावलींच्या विरोधात गांगुली यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गांगुली यांना पूर्ण २-३ वर्षे बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर राहता आलेले नाही. त्यामुळे त्यांची ही टर्म पूर्ण कशी होऊ शकते. त्यामुळे यापुढे बीसीसीआयचा तीन वर्षांचा कुलिंग पिरिएडचा नियम रद्द करावा आणि गांगुली यांना पुढील तीन वर्षे बीसीसीआयमध्ये काम करायला द्यावे, असे त्यांनी याचिकेमध्ये म्हटले आहे. आता १७ ऑगस्टला या याचिकेवर न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यावेळी जर गांगुली यांच्या बाजूने निर्णय आला तर ते पुन्हा बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर विराजमान होऊ शकतात.

गांगुलींना आयसीसीचे अध्यक्षपद मिळू शकते…न्यायालयाचा निर्णय जर गांगुली यांच्या बाजूने लागला नाही तर त्यांना तीन वर्षांसाठी बीसीसीआय सोडावे लागणार आहे. पण त्यांच्यापुढे आयसीसीच्या अध्यक्षपदाचा मार्ग खुला आहे. बीसीसीआयने जर त्यांना परवानगी दिली तर ते आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी आपला दावा सांगू शकतात. आयसीसीच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत ते उतरू शकतात. पण त्यासाठी त्यांना अन्य देशांच्या क्रिकेट मंडळांचाही पाठिंबा महत्वाचा ठरणार आहे. पण गांगुली यांचीभारताला आयसीसीच्या अध्यक्षपदी जाण्याची इच्छा आहे का, हे सर्वात महत्वाचे आहे. जर गांगुली यांना आयसीसीच्या अध्यक्षपदावर जायचे असेल तर त्यांना बऱ्याच देशांचा पाठिंबा मिळू शकतो, असेही म्हटले जात आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here