करोनामुळे चार महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट ठप्प होते. पण त्यानंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी क्रिकेट मालिका सुरु करण्यात आली. आता इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या मालिकेचे यश पाहता आयसीसीनेही आता क्रिकेट स्पर्धा भरवायला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे.
भारतामध्ये २०२३ साली क्रिकेट विश्वचषक होणार आहे. आयसीसीने हा विश्वचषक पुढे ढकलला आहे. कारण भारतातील विश्वचषक हा मार्च-एप्रिल महिन्यात खेळवण्यात येणार होता. आता हा विश्वचषक नोव्हेंबर महिन्याक खेळवण्यात येणार आहे. या विश्वचषकाच्या पात्रता स्पर्धांना आता आयसीसीने सुरु करायचे ठरवले आहे.
स्पर्धेची आखणी असेल तरी कशी…आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीतील पहिल्या सात संघांना विश्वचषकात थेट प्रवेश दिला जातो. भारतात होणाऱ्या विश्वचषकाच्या पात्रतेसाठी १३ संघ मैदानात उतरणार आहेत. यामध्ये तेरावा संघ हा नेदरलँड्सचा आहे. कारण त्यांनी २०१५-१७ या कालामधीमध्ये खेळवण्यात आलेल्या आयसीसीच्या सुपर लीग स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे त्यांना पात्रता स्पर्धेत सामील करण्यात आले आहे. या पात्रता स्पर्धांमध्ये दोन देशांमध्ये तीन सामन्यांच्या प्रत्येकी आठ मालिका खेळवण्यात येतील. यावेळी चार मालिका या घरच्या मैदानावर आणि चार मालिका या प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात खेळाव्या लागणार आहे. या स्पर्धेत एका सामन्यात विजयी झाल्यास संघाला १० गुण मिळणार आहेत. त्याचबरोबर सामना बरोबरीत सुटला किंवा रद्द झाला तर प्रत्येक संघाला प्रत्येकी पाच गुण देण्यात येतील.
कोणत्या देशांमध्ये होणार पहिला स्पर्धापहिली पात्रता स्पर्धा विश्वविजेता इंग्लंड आणि आयर्लंड या दोन देशांमध्ये होणार आहे. या दोन देशांतील मालिकेला ३० जुलैपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत इंग्लंडचा संघ कशी कामगिरी करतो. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
I like this website very much, Its a very nice office to read and incur information.
These are actually great ideas in concerning blogging.
I really like and appreciate your blog post.
Like!! Thank you for publishing this awesome article.