काही जणांना आयुष्यात एकदा प्रेम करण्याची संधी मिळते, तर काही काहींना बऱ्याचदा ही संधी मिळते. कदाचित खरं प्रेम नेमकं, असतं तरी काय, हे सामजायला त्यांना जास्त वेळ लागत असावा. अशीच एक गोष्ट क्रिकेटपटूच्या बाबतीतही घडली. क्रिकेटच्या मैदानात धडाकेबाज फलंदाजी करणारा क्रिकेटपटू आपल्या प्रेयसीबरोबर डेटिंगही करत होता. पण काही काळात तिने त्याचा साथ सोडला. त्यामुळे तो निराश झाला होता. आता काय करायचे, हे त्याला समजत नव्हते. त्याचवेळी एक चेहरा त्याच्या समोरून गेला आणि पहिल्याच नजरेत तो एका मुलीच्या प्रेमात पडला.

बॉलीवूडच्या सिनेमाला साजेशी अशीच या क्रिकेटपटूची लव्ह स्टोरी आहे. कारण पहिल्या भेटीतच तो तिच्यावर फिदा झाला होता. त्यानंतर तो तिला भेटण्यासाठी काही ना काही युक्ती करायचा. महिन्याभरानंतर तो तिला डेटिंगवर घेऊन गेला होता. त्याचवेळी त्यांने आपल्या मनातली गोष्ट तिला सांगितली आणि तिनेही होकार दिला. त्यानंतर या दोघांची लव्हस्टोरी सुपरहिट ठरल्याचे पाहायला मिळाले.

वाचा-

एका पार्टीमध्ये त्या दोघांची भेट झाली. ती खेळाशी निगडीत कार्यक्रम करायची, सूत्र संचालन करायची. त्यामुळे खेळाडूंच्या पार्टीमध्ये तिचं येणं जाणं होतं. यावेळी क्रिकेटपटूला ती आवडली आणि त्याने ही गोष्ट आपल्या सहकारी क्रिकेटपटूच्या पत्नीला सांगितली. त्यानंतर त्या क्रिकेटपटूच्या पत्नीने या दोघांची ओळख करून दिली आणि एका सुपरहिट लव्हस्टोरीला सुरुवात झाली.

ही लव्ह स्टोरी आहे तरी कोणत्या क्रिकेटपटूची…
क्रिकेटच्या मैदानात धडाकेबाज कामगिरीने त्याने सर्वांचे मन जिंकले होते, दिसायलाही तो हँडसम होता. पण पहिल्या प्रेम प्रकरणात त्याच्याबरोबर धोका झाला होता. पण त्यानंतरची त्याची लव्ह स्टोरी सुपरहिट ठरली होती. हा क्रिकेटपटू आहे ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसन.

एका पार्टीमध्ये वॉटसनला ली फर्लांग नावाची निवेदिका मनात भरली होती. ही गोष्ट त्याने आपल्या संघातील ब्रेट लीच्या बायकोला सांगितली. त्यानंतर ब्रेट लीच्या बायकोने वॉटसन आणि ली फर्लांग यांची ओळख करून दिली. त्यानंतर महिन्याभरात या दोघांनी डेटिंगला सुरुवात केली. चार वर्षे या दोघांनी डेटिंग केल्यावर २०१० साली लग्न केले. आता या दोघांना दोन अपत्यही आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here