नवी दिल्ली: लॉकडाउनच्या काळात काम गेल्यामुळे टीम इंडियाचा व्हिलचेअर क्रिकेट संघाचा माजी कर्णधार यांना मजूरी करावी लागत होती. या संदर्भातील वृत्त सोमवारी समोर आले होते. या वृत्तानंतर आता स्थानिक प्रशासनाने त्यांची मदत करण्याची ठरवले आहे. धामी यांच्या अडचणी लवकरच दूर होतील.

भारताच्या व्हिलचेअर क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्या उत्तराखंडचा कर्णधार असलेले राजेंद्र यांना कुटुंबाचा खर्च चालवण्यासाठी मजूरी करावी लागते. गेल्या काही महिन्यांपासून ते ज्या मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण देत होते. ते करोनामुळे येत नसल्याने त्यांचे उत्पन्नाचे साधन गेले.

वाचा-
घरात पैसेच शिल्लक नसल्यामुळे कुटुंबाचे पोट भरण्यासाठी अखेर राजेंद्र यांना मजुरी करावी लागली. त्यांना वयाच्या तिसऱ्या वर्षी पॅरालिसिसचा अटॅक आला. त्यामुळे ते ९० टक्के दिव्यांग झाले. पण राजेंद्र यांनी हार मानला नाही. क्रिकेटच्या मैदानावर त्यांनी नाव कमावले. इतक नव्हे तर इतिहासात विषयात एम ए आणि बीएड ही पदवी घेतली. शैक्षणिक योग्यता आणि क्रीडा क्षेत्रात देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या या खेळाडूकडे करोना लॉकडाउनमुळे उत्पन्नाचे कोणते साधन नाही.

राजेंद्र यांच्या परिस्थितीची बातमी जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी क्रीडा अधिकाऱ्यांना तातडीने धामी यांना आर्थिक मदत देण्याचे आदेश दिलेत. त्याच बरोबर आता त्यांना राज्य सरकारच्या एखाद्या स्वरोजगार योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

वाचा-
सध्या त्यांची आर्थिक परिस्थिती खराब दिसत आहे. आम्ही जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना धामी यांना तातडीने पैसे देण्यास सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्री स्वरोजगार योजना अथवा अन्य कोणत्यातरी योजनेतून लाभ देण्यास सांगितले आहे. जेणेकरून ते भविष्यात उत्पन्न मिळवू शकतील, असे पिथौरागडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय कुमार जोगदांडे यांनी सांगितले.

लॉकडाउननंतर काही महिन्यातच परिस्थिती बिघडली. माझ्या आई-वडिलांचे वय झाले आहे. एक बहिण आणि छोटा भाऊ आहे. भाऊ गुजरातमधील एका हॉटेलमध्ये काम करत होता. पण आता त्याची ही नोकरी गेली. त्यामुळेच मनरेगा योजने अंतर्गत गावात काम करतोय, असे धामी म्हणाले होते.

वाचा-
या काळात कोणी मदत केली नाही का असा प्रश्न जेव्हा राजेंद्र यांना विचारला तेव्हा ते म्हणाले, काही लोकांनी मदत केली. यात सोनू सूद देखील आहेत. त्यांनी ११ हजार रुपये पाठवले. त्याशिवाय रुद्रपूर आणि पिथोरागड येथून काही लोकांनी मदत पाठवली. त्यामुळे काही दिवसांची सोय झाली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here