सध्या बीसीसीआय खेळाडूंसोबत वार्षिक करार करते आणि या करारानुसार त्यांना पैसे मिळतात. याशिवाय जाहिरातीच्या माध्यमातून क्रिकेटपटू मोठी कमाई करतात. सध्या काही खेळाडू सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून पैसे कमवतात. सध्याच्या करारानुसार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना सर्वाधिक ७ कोटी इतके मानधन मिळते.
वाचा-
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू याने १९८३ साली वर्ल्ड कप विजेत्या संघाचे पे-स्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पे-स्लिपनुसार भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला २ हजार १०० रुपये दिले होते. ही पे-स्लिप शेअर करताना रमीझ राजाने १९८६-८७ साली जेव्हा पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता तेव्हा ५ कसोटी आणि ६ वनडे सामने खेळण्यासाठी ५५ हजार रुपये मिळाल्याचे सांगितले.
भारताने २०११ साली दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला. या विजेत्या संघातील खेळाडूंना बीसीसीआयने दोन कोटी दिले होते. पण ८३च्या विजेत्या संघातील खेळाडू इतके नशिबवान नव्हते. लता मंगेशकर यांनी नॅशनल स्टेडियमवर एक कार्यक्रम केला होता. यातून जमा झालेल्या पैशातून प्रत्येक खेळाडूला एक-एक लाख रुपये देण्यात आले होते.
वाचा–
१९८३ साली लॉर्ड्स मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात अंतिम लढत झाली. तेव्हा वेस्ट इंडिज संघाने सलग दोन वर्ल्ड कप जिंकले होते आणि ते सलग तिसऱ्या फायनलमध्ये पोहोचले होते. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा डाव ५४.४ षटकात फक्त १८३ धावांवर संपुष्ठात आला. के.श्रीकांत यांनी सर्वाधिक ३८ धावा तर मोहिंदरअमरनाथ यांनी २६ धावा केल्या. त्याआधीच्या सामन्यात झिम्बब्वे विरुद्ध नाबाद १७५ धावांची वादळी खेळी करणारा भारताचा कर्णधार कपिल देव फक्त १५ धावा करून बाद झाला.
तिसऱ्या विश्व विजयासाठी फक्त १८६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाने जल्लोषाची तयारी केली होती. पण टीम इंडियाच्या मनात काही वेगळेच सुरू होते. वेस्ट इंडिजची पहिली विकेट ५ धावांवर पडली. त्यानंतर पुढच्या ६१ धावात वेस्ट इंडिजची अवस्था ५ बाद ६६ अशी झाली. वेस्ट इंडिजची पाचवी विकेट त्यांचा कर्णधार सर क्लाइव्ह लॉईड यांची होती. या सामन्यात कपिल देवने व्हिव्ह रिचर्ड्सचा शानदार असा कॅच घेतला होता.
त्यानंतर वेस्ट इंडिजा डाव ५२ षटकात १४० धावात संपुष्ठात आला आणि भारताने ४३ धावांनी विजय मिळवत पहिल्या विजेतेपदाला गवसणी घातली. भारताकडून अमरनाथ आणि मदनलाल यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या होत्या.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
A big thank you for your article.
A big thank you for your article.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.