कॅन्सर या एक दुर्धर आजार आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. कॅन्सर झालेला व्यक्ती वाचेल की नाही, याबाबत साशंकता असते. पण भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग हा कॅन्सर झाल्यावर मैदानातही उतरला होता. एवढे मानसीक आणि शारीरिक बळ त्याला कुठून मिळाले, याची उत्सुकता चाहत्यांना होती. पण याबाबतचा खुलासा आज दस्तुरखुद्द युवराजनेच केलेला पाहायला मिळत आहे.

युवराजने भारताला २०११ साली विश्वचषक जिंकवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. या विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडूचा मानही युवराजला मिळाला होता. पण हा विश्वचषक झाल्यावर युवराजला कॅन्सर झाल्याचे समजले आणि चाहत्यांना एकच धक्का बसला. कारण युवराजसारख्या खेळाडूला कॅन्सर होणे, ही एक धक्कादायक गोष्ट होती.

कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी युवराज अमेरिकेत गेला होता, तिथे त्याच्यावर उपचार सुरु होते. जेव्हा कोणालाही एखादा दुर्धर आजार होतो तेव्हा त्याचे शारीरिक संतुलन ढासळलेले असतेच, पण त्याचे मानसीक खच्चीकरणही होऊ शकते. त्यामुळे या कालखंडात त्या व्यक्तीला एका व्यक्तीची गरज असते, जी त्याला मानसीक आधार देऊ शकेल. युवराजलाही अशी एक व्यक्ती त्या काळात मिळाली, ज्या व्यक्तीमुळेच युवराजला मैदानात उतरण्याची प्रेरणा मिळाली.

याबाबत युवराज म्हणाला की, ” कॅन्सरसारख्या आजारातून बरे होऊन मैदानात परतणे ही नक्कीच सोपी गोष्ट नाही. पण यावेळी मला एक आधारवड मिळाले. त्या व्यक्तीने माझे जे ब्रेन वॉश केले, त्यानंतर मला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली. ती व्यक्ती आहे भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर.”

कॅन्सर झाल्यावर सचिन हा युवराजच्या संपर्कात होता. त्याचबरोबर कॅन्सरमधून बाहेर पडल्याचवर तु काय करायला हवे, हेदेखील सचिन युवराजला सांगत होता. याबाबत युवराज म्हणाला की, ” कॅन्सरमधून बाहेर पडून क्रिकेट खेळणे सोपे नाही. पण मला सचिनने त्यावेळी सांगितले की, आपण ज्या गोष्टीवर प्रेम करतो, ती गोष्ट आपल्याला आनंद देते. पण १० वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यावर मला स्थानिक क्रिकेट खेळायला जमणार नाही, असे वाटत होते आणि मला थेट भारतीय संघात प्रवेश मिळणार नव्हता. त्यावेळी सचिनने मला काही गोष्टी सांगितल्या, सचिनच्या या गोष्टींमधूनच मला कॅन्सरनंतर क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here