वाचा-
करोना संसर्ग होऊ नये म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) खेळाडूसाठी आणि मैदानावरील नवे नियम लागू आहेत. यामुळेच काही क्रिकेटपटूंनी निवृत्तीचा विचार केला. कोरनामुळे खेळाडूंना क्वारंटाइनच्या नियमांचे पालन करावे लागेल आणि त्यासाठी कुटुंबाशिवाय प्रवास करावा लागणार. चेंडूशी छेडछाड केल्या प्रकरणी वर्षाची बंदीला सामोरे जावे लागलेला ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज त्याच्या भविष्याबद्दल पुनर्विचार करत आहे.
वाचा-
वॉर्नरच्या कुटुंबात पत्नी कॅडाइस आणि तीन मुली आहेत. मला कुटुंबापासून दूर राहणे इतके सोपे असणार नाही. पत्नी आणि तीन मुली माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहेत. तुम्हाला नेहमीच स्वत:च्या कुटुंबाबद्दल विचार करावा लागतो. सध्याच्या परिस्थितीत असे महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात, असे त्याने म्हटलेय.
क्रिकेट करिअर सुरू ठेवण्यासाठी मी प्रयत्न करेन. या वर्षी टी-२० वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात होणार नाही. ही स्पर्धा खेळणे आणि विजय मिळवणे हे एक स्वप्न होते. आता स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. जेव्हा टी-२० वर्ल्ड कप भारतात होईल तेव्हा मला त्यावर पुन्हा एकदा विचार करावा लागेल.
वाचा-
मला कुटुंबातील परिस्थितीचा विचार करावा लागेल. मुली शाळेला जात असतील का? असे अनेक निर्णय घ्यावे लागतील. मॅच कधी खेळायचे अथवा किती वेळ क्रिकेट खेळायचे, हा एक कौटुंबिक निर्णय असेल असे वॉर्नर म्हणाला.
ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया प्रांतात करोना रुग्णांची वाढणारी संख्या पाहता बॉक्सिंग डे कसोटी अनेक आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन गमवावे लागण्याची शक्यता त्याने व्यक्त केली. भविष्यात येथे क्रिकेट सुरू होण्याची शक्यता दिसत नाही असे ही तो म्हणाला.
वाचा-
अफगाणिस्तान आणि भारत यांच्या विरुद्धच्या कसोटी मालिके आधी लाल चेंडूने सराव करण्याची संधी कमी मिळेल याकडे वॉर्नरने लक्ष वेधले. कारण कसोटी मालिकेआधी संघ वनडे आणि टी-२० सामने अधिक खेळणार आहे. सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाईल. त्यानंतर वॉर्नरसह काही ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएल खेळतील. आयपीएलनंतर प्रथम अफगाणिस्तान आणि मग भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
Your site is very helpful. Many thanks for sharing!
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
A big thank you for your article.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.