मुंबई: यंदाची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ९ फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे. भारतीय संघ नवीन वर्षातील वनडे आणि टी-२० मालिका जिंकत आपल्या शानदार फॉर्मात आहेत. तर भारताचे सिनियर खेळाडूही ब्रेकनंतर या मालिकेसाठी संघात परतले आहेत. विराट कोहलीही कसोटी संघामध्ये परतण्यासाठी विमानतळावर दिसला. विराट काळ्या रंगाचा टी शर्ट घालून विमानतळावर पोहोचला आणि त्या टीशर्टची किंमत इतकी आहे की एक नवीकोरी बाइक तर आरामातच विकत घेता येईल. पाहूया काय आहे या टी-शर्टची किंमत.

विराट कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत ब्रेकवर होता. या ब्रेकदरम्यान तो आपल्या कुटुंबासोबत उत्तराखंडमध्ये गेला होता. तिथे त्यांनी धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. विराट अनुष्का आणि त्यांची लेक वामिका यांनी स्वामी दयानंद गिरी आश्रमाला भेट दिली. तिथे साधुसंतांसाठी त्यांनी भंडारादेखील ठेवला होता. त्यांचे येथील चाहत्यांसोबतचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. यानंतर हे तिघेही उत्तराखंडमध्ये ट्रेकिंग करतानाचे फोटो विराट आणि अनुष्काने त्यांच्या सोशल मीडियावरून पोस्ट केले.

Virat Kohli In givenchy tshirt at mumbai airport

आता या ब्रेकनंतर विराट संघात परतला आहे. गुरुवारी रात्री तो मुंबईहून नागपूरला जाताना विमानतळावर दिसला होता. त्यावेळेस त्याच्या टी-शर्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विराट कोहली एका महागड्या ब्रँडचा (Givenchy) टी-शर्ट घालून विमानतळावर पोहोचला. या टी-शर्टची किंमत सुमारे दीड लाख रुपये इतकी आहे. यामध्ये एक नवीन बाईक सहज खरेदी करता येईल. विराट कोहली हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटर आहे. कमाईच्या बाबतीत तो भारतातील अव्वल खेळाडू आहे.

भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका ९ फेब्रुवारीपासून सुरू होत असून या चार सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना ९ मार्चला होणार आहे. ही कसोटी मालिका आगामी वर्लड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची ठरणार आहे. भारताने ही मालिका जिंकली तर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या टक्केवारीत अव्वल स्थानावर पोहोचत अंतिम सामन्यात धधक मारू शकते. यानंतर दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. या दोन्ही मालिका खूप महत्त्वाच्या आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here