चीनमधीन करोना व्हायरस हा जगभरात पसरला. चीनमध्ये नोव्हेंबर महिन्यात करोना पसरल्याचे म्हटले जाते. पण त्यानंतर मार्च महिन्यांमध्ये तो जगभरात पसरला. त्यामुळे मार्चपासून सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद केली होती. त्यामुळे परदेशी नागरिकांना आपल्या देशात जाता येत नव्हते. दक्षिण आफ्रिकेच्या एका गोलंदाजांचीही अशीच परिस्थिती झाली होती.
करोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आला. त्यामुळे विमान सेवा बंद करण्यात आल्या. तेव्हा आफ्रिकेचा एक गोलंदाज पाकिस्तानमध्ये एका कामानिमित्त गेला होता. पण विमान सेवा बंद झाल्यामुळे तो पाकिस्तानमध्येच अडकून पडला होता. गेल्या ४-५ महिन्यांपासून तो पाकिस्तानमध्येच अडकलेला होता. पण अखेर काही खास विमानसेवा सुरु झाली आणि तो थेट वेस्ट इंडिजमध्ये पोहोचल्याचे पाहायला मिळाले.
हा क्रिकेटपटू आहे तरी कोण…दक्षिण आफ्रिकेचा हा क्रिकेटपटू आहे फिरकीपटू इम्रान ताहिर. आपल्या फिरकीच्या जोरावर ताहिरने आतापर्यंत बऱ्याच फलंदाजांना चांगलेच नाचवले आहे. ताहिर हा आफ्रिकेकडून खेळत असला तरी त्याचे मूळ पाकिस्तानमधील आहे. ताहिर हा पाकिस्तानमधील लाहोरचा राहणारा होता. पण काही कारणास्तव तो दक्षिण आफ्रिकेमध्ये गेला आणि तिथेच स्थायिक झाला.
नेमके घडले तरी काय…पाकिस्तानमधील काम आटपून ताहिर दक्षिण आफ्रिकेमध्ये आपल्या घरीच जाणार होता. पण करोनामुळे लॉकडाऊन सुरु झाले आणि त्यामुळे विमान सेवा बंद झाल्या, त्यामुळे ताहिरला आपल्या घरी दक्षिण आफ्रिकेमध्ये जाता आले नाही. त्यामुळे ताहिरचेचार महिने वाया गेले. आता चार महिन्यांनंतर कॅरेबियन क्रिकेट लीगला सुरुवात होणार आहे. त्यामुळे त्याला आता खेळण्यासाठी वेस्ट इंडिजला जाणे भाग आहे. त्यामुळे पाकिस्तानमधून त्याला दक्षिण आफ्रिकेमध्ये जाता आले नाही आणि तो थेट वेस्ट इंडिजला रवाना झाला आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
I like this website very much, Its a very nice office to read and incur information.
I like the valuable information you provide in your articles.
Thank you ever so for you article post.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.