करोनामुळे देशभरात काही कडक नियम लावण्यात आले आहेत. त्यामुळे काही जणांवर तर थेट उपासमारीची वेळ आली आहे. भारताचा एक माजी क्रिकेटपटूही या फेऱ्यामध्ये अडकला आहे. त्यामुळे आता क्रिकेट सोडून चक्क शिपायाचे काम करण्यासाठी तो तयार झाला आहे.

एकेकाही या क्रिकेटपटूने भारताचे नेतृत्व केले होते. पण आज करोनाच्या काळात त्याच्यावर वाईट वेळ आल्याचे पाहायला मिळत आहे. करोनाच्या काळात त्याच्या कुटुंबियांवरही वाईट वेळ आलेली आहे. त्यामुळे आता पोटासाठी क्रिकेट नाही तर शिपायाची नोकरी करण्यासाठी तो तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे.

वाचा-

भारतासाठी क्रिकेट खेळलेल्या या खेळाडूवर आता वाईट वेळ आल्याचे पाहायला मिळत आहे. या खेळाडूच्या कुटुंबात पत्नी आणि एका वर्षाची मुलगी आहे. आताच्या घडीला त्याच्याकडे पैसे नाहीत. आयुष्यात सर्व सोंगं आणता येतात, पण पैशाचे सोंग आणता येत नाही. त्यामुळे आता पैसे कमावण्यासाठी चक्क शिपायाची नोकरी करायलाही हा क्रिकेटपटू तयार झाला आहे. कारण सध्याच्या घडीला त्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत झालेली आहे. घरात पैसा नाही आणि खर्च समोर उभे आहेत. त्याचबरोबर एक वर्षाच्या मुलीचा खर्च कसा भागवायचा, हा प्रश्नही त्यासाठी मोठा आहे. त्यामुळे आपण भारतासाठी खेळलेलो असलो तरी सध्या पोट भरण्यासाठी आपल्याला शिपायाची नोकरी करावी लागली तरी चालेल, असे त्याने मनाशी ठरवलेले आहे.

वाचा-

भारताच्या दिव्यांग संघाकडून खेळलेल्या दिनेश सैन याची ही कहाणी आहे. आतापर्यंत भारतासाठी त्याने ९ सामने खेळले आहेत. २०१५ साली झालेल्या पाच देशांच्या स्पर्धेत दिनेशने आठ विकेट्स मिळवल्या होत्या, यापैकी दोन विकेट्स त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मिळवल्या होत्या. पण आता या क्रिकेपटूला शिपायाचे काम करावे लागू शकते.

वाचा-

याबाबत दिनेश म्हणाला की, ” मी १२वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर मी क्रिकेट खेळायला लागलो. मी भारताकडूनही क्रिकेट खेळलो. पण माझ्याकडे सध्याच्या घडीला घर चालवण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे मी राष्ट्रीय उत्तेजत प्रतिबंध संस्थेत (नाडा) शिपायाच्या पदासाठी अर्ज केला आहे. माझे वय ३५ वर्षे आहे आणि सरकारी नोकरी मिळवण्यासाठी माझ्यासाठी ही अखेरची संधी आहे. मला जर ही नोकरी मिळाली तर नक्कीच माझ्या कुटुंबियांना त्याचा हातभार लागेल.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here