ऑस्ट्रेलियाची आघाडीची महिला क्रिकेटपूट अॅलिसा पेरीने पती मॅट टोमुआला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेरी आणि मॅट यांच्या नात्यात तणाव होते. घटस्फोटाचे वृत्त सोशल मीडियावर येताच. लोकांनी भारतीय क्रिकेटपटू मुरली विजयला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
वाचा-
काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्जच्या लाइव्ह चॅटमध्ये मुरली विजयने म्हटले ह होते की ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू सोबत डिनरला जाण्यास आवडले. विजयने आपल्याला पेरी छान वाटते असे देखील म्हटली होती. एक क्रिकेटपटू म्हणून पेरी त्याची फेव्हरेट असल्याचे विजय म्हणाला होता.
मुरलीच्या या विधानानंतर सोशल मीडियावर डिनर डेटवर चर्चा रंगली होती. नंतर पेरीने देखील डिनरचा पूर्ण खर्च तुलाच (मुरली) करावा लागेल असे सांगत मुरलीची फिरकी घेतली होती. जर त्याने खर्च केला तर मी नक्कीच डेटवर जाईन, असे पेरी म्हणाली होती.
वाचा-
आता पेरीचा घटस्फोट होणार आहे या वृत्तानंतर अनेकांनी मुरलीचा मार्ग मोकळा झाला, अशी प्रतिक्रिया देत आहेत. मुरली आता पेरीला प्रप्रोज करू शकतो किंवा डिनर डेटला येणार का विचारू शकतो, असे युझर सोशल मीडियावर म्हणत आहेत.
मुरली विजयने क्रिकेटपटू दिनेश कार्तिकच्या पहिल्या पत्नीसोबत विवाह केला आहे. आयपीएल दरम्यान कार्तिकीच पहिली पत्नी निकितासोबत विजयचे अफेअर सुरू झाले. कार्तिकला घटस्फोट दिल्यानंतर तिने विजय सोबत विवाह केला.
पेरी आणि मॅट यांनी २०१५ साली विवाह केला होता. मॅट हा एक रग्बी खेळाडू आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times